Shocking | पंजाबमध्ये आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न, खासगी व्हिडीओ…

चंदीगढमध्ये विद्यार्थिनींचे व्हिडिओ लिक झाल्याने खळबळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

चंदीगड : पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे खासगी व्हिडीओ लिक झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. विद्यापीठातील एका विद्यार्थिनींचे हा प्रकार केल्याचे समोर आहे. या घटनेनंतर विद्यापीठातील विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा:RGP | नगर नियोजन कायद्यातील दुरुस्ती गोंयकारांना मारक ठरणार!

पोलिसांनी तिला अटक केली

विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच हे व्हिडीओ लिक केल्याचा करण्यात आलेल्या आरोपानंतर पोलिसांनी तिला अटक केली. मात्र, या प्रकरणी चंदीगढ विद्यापीठाने केलेल्या खुलाशामध्ये संशयित आरोपी विद्यार्थीनीने आपले खासगी व्हिडिओ त्याच्या बायफ्रेंडला पाठवले होते. इतर मुलींचे नाही, असा दावा केला आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु आर. एस. बावा यांनी याबाबत अधिकृत निवेदनही जारी केले आहे.
हेही वाचा:मांद्रे ग्रामपंचायत उपसरपंचावर अविश्वास ठराव संमत, ‘यांची’ निवड निश्चित…

अधिकृत निवेदनही जारी

या निवेदनात म्हटले आहे की, सात मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या अफवा पसरवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थीनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले नसल्याचे प्रभारी कुलगुरू यांनी स्पष्ट केले. तसेच प्राथमिक तपासादरम्यान, विद्यापीठातील, एका मुलीने शूट केलेला वैयक्तिक व्हिडिओ वगळता कोणत्याही विद्यार्थ्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ आढळला नसल्याचे बावा यांनी म्हटले. पोलिसांनी संबंधित विद्यार्थीनीचा फोन ताब्यात घेतला असून तपास सुरू असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा:स्थानिक भाषा समजणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच भरती करा !

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लिक झाले आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीनेच आपल्या मैत्रिणींचे व्हिडीओ लिक केल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओ लिक झाल्यानंतर येथे काही विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. मात्र पोलीस तसेच विद्यापीठ प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला आहे. व्हिडीओ लिक झाल्याचे समजल्यानंतर एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा:Accident | चीनमध्ये बसचा भीषण अपघात ; २७ प्रवासी ठार

घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

पंजाब सरकारने या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चंदीगड विद्यापीठातील घटनेबद्दल ऐकून वाईट वाटले. आमच्या मुली हा आमचा अभिमान आहे. मी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहे. या घटनेबद्दल निर्माण होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे.
हेही वाचा:JOB VARTA | गोवा राज्य जैवविविधता मंडळात नोकरीची संधी…

महिला आयोगाकडून दखल

दरम्यान, या घटनेची दखल पंजाब महिला आयोग तसेच पंजाबचे शालेय शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैंस यांनी घेतली आहे. ही अतिशय गंभीर घटना असून चौकशी सुरू आहे. आरोपींना निश्चितच शिक्षा मिळेल, असे पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषा गुलाटी यांनी सांगितले. तर गुन्हेगारांस सोडले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शांतता बाळगावी, असे आवाहन शिक्षणमंत्री हरजो सिंग बैंस यांनी केले आहे.
हेही वाचा:Goa Politics | ७२ तासांत अविश्वास ठराव! मडगाव नगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!