उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेला पुळका? उमेदवारीची चर्चा रंगली

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वतुर्ळात चर्चा पुन्हा रंगली आहे. चर्चेचं केंद्रबिंदू आहे उर्मिमा मांतोडकर. उर्मिला मांतोडकरला (Urmila Matondkar) शिवसेना विधानपरिषेदवर उमेदवारी देण्याची शक्यता आहे. राजकारणात कुणीही कुणाचा शेवटपर्यंत शत्रूही नसतो आणि मित्रही नसतो, असं म्हणतात. त्याचाच परिणाम म्हणून की काय ही चर्चा नव्यानं रंगू लागली आहे.
राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 जागांवर उर्मिलाची वर्णी शिवसेनेकडून लागेल, असं बोललं जातंय. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही वृत्तवाहिन्यांनी विचारणा केली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना सावध भूमिका मांडली आहे.
संजय राऊत म्हणाले की…
उर्मिलाच्या नावाची चर्चा मीही ऐकतोय. पण हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. यावर मंत्रिमंडळ निर्णय घेईल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंत्रिमंडळाने याबाबतचे अधिकार दिलेले आहेत.
विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 जागा एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपल्यानं रिक्त झालेल्या. राज्य सरकारने या जागांवर नियुक्त्यांसाठी काही नावं पाठवली होती. पण संविधानातील तरतुदींकडे बोट राज्यपालांनी बोट दाखवलं होतं आणि विधान परिषदेवर राजकीय नियुक्त्या करण्यास नकार दिलेला.
राज्यपाल नामनिर्देशित सदस्य हे साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रांतील विशेष ज्ञान आणि अनुभव संपन्न असावेत अशी तरतूद संविधानात आहे. त्या आधारे राज्यपालांनी राज्य सरकारला नव्यानं नावांची शिफारस करण्यास सांगितलं होतं. अखेर राज्यपालांची सूचना सरकारला मान्य करावी लागलीय.
ती 12 नावं कुणाची?
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या 12 जागांचं समान वाटप करण्यात आलंय. तीनही पक्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. त्यातून दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार नावे निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचीही चार नावे निश्चित झाल्याचं कळतंय. मात्र ही नावं कोणती, हे अजून कळू शकलेलं नाही.
हेही वाचा –
यालाच म्हणतात आदरपूर्वक लाज काढणं!
भाजपच्या फेक न्यूजना फेसबुकवर मोकळं रान!
बापरे! पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर त्यांचे 22 तुकडे केले
पाहा व्हिडीओ –