शिवरायांनी ताठ मानेनं जगायला शिकवलं!

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिवजागर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

दोडामार्ग : ताठ मानेनं, स्वाभिमानानं कसं जगायचं हे शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं, असं प्रतिपादन अ‍ॅड. शिवाजी देसाई यांनी केलं. ते दोडामार्ग तालुक्यातल्या मोर्ले इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिवजागर हा कार्यक्रम शिवप्रेमींकडून आयोजित केला जातो. 31 डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यांवर दारूच्या पार्ट्या आयोजित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा जागर केला जातो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी जागरूक युवक 31 डिसेंबरला रात्री किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पहारा देत असतात. चंदगड तालुक्यातल्या पारगड या किल्ल्यावर असा प्रकार होउ नये, यासाठी या किल्ल्याकडे जाणार्‍या मार्गावरील गावांमध्ये 31 डिसेेंबरला पहारा ठेवण्यात आला. दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात श्री सातेरी मंदिराजवळ युवकांनी जमून पारगड किल्ल्याकडे जाणार्‍यांवर लक्ष ठेवलं.

यावेळी युवकांना संबोधित करताना अ‍ॅड. शिवाजी देसाई बोलत होते.

पाहा, फेसबुक लाईव्ह…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.