लग्नानंतर शिक्षणासाठी पतीला दिली सोडचिठ्ठी

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात ही घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

पाटणा: लग्नानंतर शिक्षण घेण्यास आणि नोकरी करण्यास मज्जाव करणाऱ्या पतीला सोडचिठ्ठी देण्याची आणि आपलं करिअर घडवण्याची अनुमती एका मुलीला ग्रामकचेरीने (गावातील न्यायालय) दिली आहे. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात ही घटना घडली.

हेही वाचाः आयुष्यभर अन् आयुष्याच्या शेवटीही ‘साथ साथ…’

उच्च शिक्षण घेऊन नोकरी करण्याची इच्छा

या मुलीचं दीड महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. त्यानंतरही तिला आयटीआयचं शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्याची इच्छा होती. नोकरी लागली की, ती पुढचं उच्च शिक्षण घेणार होती. पण, त्याला पती सुनीलकुमार आणि सासरच्या मंडळींनी विरोध दर्शवला होता. शिक्षण, करिअरसाठी तळमळणाऱ्या या मुलीने आपल्या ध्येयापायी गावातून निघून पाटणा गाठलं. मात्र , ती बेपत्ता असल्याची तक्रार या मुलीचे वडील गुरुदेव पंडित यांनी पोलिसांत दाखल केली होती. तिचे अपहरण झाले असावं, अशी त्यांना शक्यता वाटत होती.

हेही वाचाः विना सहकार आहे सरकार

मी दबावाखाली हे लग्न केलं

ही मुलगी व तिचा पती यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही ग्रामकचेरीसमोर हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. तिथे या मुलीने सांगितलं की, मी दबावाखाली हे लग्न केलं आहे. मला करिअर करायचं असून, त्याच्या आड येणाऱ्या पतीपासून वेगळं व्हायचं आहे.

हेही वाचाः ‘सनबर्न बीच क्लब’चे बांधकाम 4 आठवड्यांच्या आत पाडा

दीड महिन्यापूर्वी झाला होता विवाह

मुलीच्या वडिलांनी ग्रामकचेरीला सांगितलं की, हिंदू रितीरिवाजाप्रमाणे या दोघांचा जूनमध्ये विवाह झाला होता. पतीला सोडचिठ्ठी देण्याची परवानगी देऊन ग्रामकचेरीने माझं आयुष्य वाचवलं आहे, असे सांगत या मुलीने सर्वांचे आभार मानले.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | Goa Forward | ‘फ्रेन्डशिप डे’ला गोवा फॉरवर्डकडून प्रचाराला सुरुवात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!