ACCIDENT | ऑडी इमारतीवर आदळून भीषण अपघात

आमदाराच्या मुलगा-सुनेसह सात जणांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: आलिशान ऑडी कार रस्त्याशेजारील विजेचा खांब आणि इमारतीवर आदळून बंगळुरुत भीषण अपघात झाला. या अपघातात द्रमुक आमदार वाय प्रकाश यांच्या मुलगा-सुनेसह सात जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. भरधाव ऑडी कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचाः किरकोळ घरगुती वादातून तलवारीनं सपासप वार करत जीवघेणा हल्ला

कसा झाला अपघात?

ऑडी कार अपघातात सात जणांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्नाटकातील बंगळुरु शहरातील दक्षिणेला असलेल्या कोरमंगल भागात सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या शेजारी असलेल्या बिल्डिंग आणि विजेच्या खांबावर भरधाव वेगात असलेली ऑडी Q3 कार धडकली.

आमदारपुत्रासह सूनेचाही मृत्यू

या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने हॉस्पिटलला नेले जात असताना वाटेत प्राण सोडले. तामिळनाडूतील होसुरचे द्रमुक आमदार व्हाय प्रकाश यांचे पुत्र करुणा सागर आणि सून बिंदू यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. खुद्द आमदार वाय प्रकाश यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र इतर मृतांची नावं अद्याप समजेलली नाहीत.

हा व्हिडिओ पहाः SAD STORY | VANARMARI | गोव्यातील वानरमारी समाजाची दाहकता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!