भीषण! सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अग्नीतांडव

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पुणे : देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कोव्हिशिल्ड लस निर्मितीला धोका नाही

पुण्यातील मांजरी येथे सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत तयार करण्यात आली आहे आणि त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. मात्र, कोव्हिशिल्ड लस निर्मितीचे काम दुसऱ्या इमारतीत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

नेमकी कशामुळे लागली आग?

ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोव्हिशिल्ड लस तयार करण्याचं काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी ही आग लागलेली नाहीये तर इतर ठिकाणी ही आग लागलेली आहे.

मुख्यमंत्री स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या संपर्कात आहेत आणि संपूर्ण परिस्थितीची माहिती घेत आहेत. आवश्यक ती सर्व यंत्रणा वापरुन आणि या यंत्रणेसोबत समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पंतप्रधान मोदींनी भेट दिलेल्या इमारतीला आग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र , करोनाची लस सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असल्याने सर्व यंत्रणांनी या घटनेकडे गांभीयनि लक्ष दिलं आहे . गुप्तचर यंत्रणेने ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे की अन्य काही कारणांमुळे याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!