केंद्राकडून नवी ऑर्डर नाही, सीरम लसीचं उत्पादन 50 टक्के घटवणार

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं पुढील आठवड्यापासून कोविशिल्ड लसीचं उत्पादन 50 टक्केंनी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही ऑर्डर नसल्याचंही सीरमकडून सांगण्यात आलं आहे. मागणी पेक्षा उत्पादन जास्त असल्यान कोविशिल्ड लसीची निर्मिती कमी प्रमाणात करणार असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. आमच्याकडे केंद्र सरकारनं नोंदवलेल्या ऑर्डर्स पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण करणार असल्याचंही सीरमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीनं केंद्र सरकारला पत्र लिहून किती प्रमाणात लसी हव्या आहेत, यासंदर्भात माहिती हवी असल्याचं कळवलं आहे.

सीरम एका महिन्याला किती लसी उत्पादित करते

सीरम इन्स्टिट्य़ूट ऑफ इंडिया एका महिन्याला 25 ते 27 कोटी डोसची निर्मिती करते. पुनावाला यांनी ऑक्टोबरमध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये ते 24 कोटी डोसची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं होतं. सुरुवातील कंपनी एका महिन्याला 10 ते 11 कोटी डोस प्रति महिना बनवत होती. नोव्हेबंरपासून जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवॅक्स मोहिमेअंतर्गत कोविशिल्ड लसीची निर्मिती कंपनीनं सुरु करण्या सुरुवात केली आहे.

तर निर्यात सुरु करणार

केंद्र सरकारनं लसींची मागणी नोंदवली नाही तर आम्ही लसीचे डोस निर्यात करणार असल्याचं सीरमनं यापूर्वीच जाहीर केलं आहे. आम्ही सरकारसोबत चर्चा करत आहोत. येत्या काही दिवसात त्यासंदर्भातील माहिती मिळेल. सीरमकडे 50 कोटी डोस आहेत. हे पुढील दोन महिन्यात वापरले जातील. यामध्ये भारत सरकारला प्राथमिकता दिली जाईल, असं देखील सांगण्यात आलं आहे.

सध्या कोविशिल्ड लसीची निर्यात कमी प्रमाणात होत आहे. पुढील आठवड्यात आम्हाला लसीसाठी ऑर्डर मिळेल. गेल्या आठ महिन्यात आम्ही निर्यात केलेली नाही, असं देखील सीरमकडून सांगण्यात आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!