छातीत कळ! सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल

यापूर्वी झालीय अँजिओप्लास्टी

Goan Varta Live | प्रतिनिधी

कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांना बुधवारी कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर गांगुलीला रुग्णालयात नेण्यात आलं.

पूर्वीही हलक्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याला काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 2 जानेवारी रोजी छातीत दुखू लागल्यानंतर सौरव गांगुलीला कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे उपचार घेतल्यानंतर सौरव डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज मिळाल्यावर तो घरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.

जिममध्ये व्यायाम करताना सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याच्यावर अँजिओप्लास्टी करावी लागली होती. मागील वेळी, गांगुलीला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्या डॉक्टरांनी सांगितले होते की, गांगुलीच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आहे. यापैकी एका धमनीत 90 टक्के ब्लॉक होता.

वुडलँड हॉस्पिटलमधील 13 डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करीत होती. प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ. देवी शेट्टी यांनी सांगितले होते की, गांगुली मॅरेथॉनमध्येही सहभागी होऊ शकतात. तो क्रिकेटही खेळू शकतो. सामान्य माणसासारखा व्यायाम करू शकतो.

दरम्यान, गांगुलीच्या कुटुंबियांना आयएचडी-ईस्केमिक हृदयरोगाचा इतिहास आहे, अशी माहिती पुढे आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!