सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार; २०२१ साठी आमंत्रिक केली नामांकने

१५ ऑगस्ट २०२१ शिफारसी पाठवण्याची अंतिम तारीख

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सदर पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार हा भारताच्या एकता आणि अखंडतेच्या योगदानासाठी देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, ज्याची घोषणा भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी केली आहे. या पुरस्कारासाठी केंद्र सरकाने नामांकने आमंत्रित केली आहेत.

हेही वाचाः पक्षातील नेतेच पेरतात माझ्याविषयी अफवा

शिफारसी पाठवण्याचं आवाहन

भारतातील कोणताही भारतीय नागरिक किंवा संस्था किंवा संघटना या पुरस्कारासाठी एखाद्या व्यक्तीला नामांकित करू शकते. व्यक्ती स्वतःला देखील नामांकित करू शकते. पुरस्कारासाठी राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि मंत्रालय आणि भारत सरकारच्या विभागांकडून शिफारशी मागविल्या आहेत. www.nationalunityawards.mha.gov.in या ऑनलाइन पोर्टलवरून  शिफारसी पाठवण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. याविषयीची अधिक माहिती ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे.

१५  ऑगस्ट २०२१ शिफारसी पाठवण्याची अंतिम तारीख

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार, २०२१ साठी ऑनलाईन नामांकने / शिफारशी सादर करण्याची अंतिम तारीख १५  ऑगस्ट २०२१ अशी आहे. 

हा व्हिडिओ पहाः Crime | BISON | अज्ञात शिकार्‍यांकडून गव्याची हत्या

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!