एकाच कुटुंबातील 12 जण बुडाले! 6 जणांचे मृतदेह हाती

शरयू नदीत स्नान करताना दुर्घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एकाच कुटुंबातील तब्बल १२ जण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यातील ६ जणांचे मृतदेह हाती लागले असून ३ जण बेपत्ता आहेत. यामध्ये महिला आणि लहानमुलांसोबतच काही पुरुषांचा समावेश आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यातही अडचणी येत आहेत. शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, तिघांना वाचवण्यात आल्याची माहिती मिळतेय.

कशामुळे बुडाले?

आग्रातील एक कुटुंब अयोध्या धाम इथं दर्शनासाठी आले होते. त्यावेळी गुप्तार घाटामध्ये हे कुटुंब स्नानासाठी नदीत उतरलं. दरम्यान, यावेळी सुरुवातीला पाण्याच्या प्रवाहात दोघेजण वाहून गेले. त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी आणखी खोल पाण्यात उतरलेल्यांचाही बुडून मृत्यू झालाय. दरम्यान, यामध्ये ६ वर्षांच्या मुलीसह ३ लोकांना वाचवण्यात आलं आहे. दरम्यान, अजूनही बचावकार्य सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. आग्राच्या संपूर्ण कुटुंबाला वाचवण्यासाठी सैन्याची बचाव दलही नदीत खाली उतरले आहेत.

शोधकार्य सुरु

दरम्यान, या दुर्घटनेनंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दखल घेऊन यंत्रणांना बचावकार्यासाठी कामाला लावलं आहे. सैन्याचं बचाव दलही मदतीसाठी नदीत उतरलं असून शोधकार्य सुरु असल्याची माहिती मिळतेय. गरज लागली तर एनडीआरएफचं पथकही तैनात केलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

हेही वाचा

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!