संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ईडीची चर्चा काही संपायचं नाव घेत नाहीये. नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना ईडीनं नेटीस पाठवली होती. त्यानर त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असं खडसे म्हणाल् होते. दरम्यान खडसेंनी सीडी लावण्याआधी आणखी एका ईडी नोटिशीची भर पडली आहे. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीनं नोटीस पाठवली आहे.
कारण काय?
शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. यावर संजय राऊत यांनी आपल्याच शैलीत उत्तर दिलं आहे. पीएमसी बँकेतील एका आरोपीच्या पत्नीच्या सहकार्याने वर्षा राऊत यांनी ५० लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असल्याचं सांगण्यात येतंय.
आ… देखे जरा
राऊत यांनी ट्विट करून ईडी अर्थात केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया…’ अशा शब्दांत ईडीचं आव्हान स्वीकारल्याची प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
कधीचं प्रकरण?
पीएमसी बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरु आहे. मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत ईडी चौकशी करतंय. ३ ऑक्टोबर २०१९ ला ईडीकडे ही चौकशी देण्यात आली. पीएमसी बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणलेले.