VIRAL VIDEO | 1800 च्या अपार यशानंतर 10+10= 40 ची नवीन झलक…

5 रुपयांच्या 4 समोस्यांची किंमत होतेय 40; व्हायरल व्हिडीओत चिमुरड्याचा युक्तिवाद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. मागे वर्षभरापूर्वी एका तरुणाशी 1800 रुपयांच्या हिशेबावरुन वाद घालणाऱ्या काकू सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. असाच एक व्हिडीओ आताही व्हायरल झाला आहे. फरक फक्त एवढाच आहे काकूंची जागा घेतलीय एका समोसा विकणाऱ्या चिमुरड्याने आणि तो वाद घालतोय समोसा विकत घेणाऱ्या काकूंशी…!

हेही वाचाः VIRAL VIDEO : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदाराच्या कानाखाली वाजवली!

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

एक चिमुरडा समोसे विक्री करतोय. तो एका काकूंच्या घरी समोसे विकण्यासाठी जातो. पाच रुपयांना एक समोसा याप्रमाणे काकू त्याच्याकडून चार समोसे घेतात. म्हणजेच एकूण 20 रुपयांचे समोसे काकू त्या चिमुरड्याकडून विकत घेतात. पण माझ्या 4 समोस्यांची किंमत 5 रुपयांप्रमाणे 40 रुपये होतीय, असं तो लहान मुलगा काकूंना सांगतोय.

हेही वाचाः CCTV VIDEO | चेकपोस्टवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

मुलगा आपल्या 40 रुपयांच्या हिशेबावर ठाम

व्हायरल व्हिडीओत काकू त्याला समजावून सांगताना दिसून येत आहेत की एक समोसा 5 रुपयांना, दोन समोसे 10 रुपयांना मग आणखी दोन समोरे 10 रुपयांना… असं म्हणत असताना ते 2-2 समोसे त्याच्या हातावर ठेऊन त्याला समोस्याचा हिशेब सांगत असतात. मात्र काकूंचं सगळं ऐकल्यावर मुलगा आपल्या 40 रुपयांच्या हिशेबावर ठाम राहतो.

हेही वाचाः कोरोनाला पळवून लावण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं

व्हिडीओ पाहून हसू अनावर

काकू आणि समोसा विकणाऱ्या मुलाची हिशेब प्रक्रिया बघून साहजिक शेजारी उभ्या असणाऱ्या तरुणाने हा सगळा प्रसंग आपल्या कॅमेरात टिपला. हा तरुण देखील चिमुरड्याला 20 आणि 40 रुपयांचा हिशेब समजावून सांगत होता. पण मुलगा मात्र ऐकायला तयार नव्हता. साहिजक हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झाल्याशिवाय राहत नाही.

हेही वाचाः बालकांचं लसीकरण तीन-चार दिवसांसाठी होणार बायणा रवींद्र भवनात

सोशल मीडियावर दोन गट

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एक गट मुलाबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहे तर एक गट मुलाची चेष्टा उडवताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगात व्हायरल होत आहे.

हेही वाचाः VACCINATION | कोविड लसीकरणाबाबतच्या नियमात बदल

व्हिडिओ पहा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!