सलमान खानला मिळाला शस्त्र परवाना कारण जीवे मारण्याची…

गँगस्टर्सकडून मिळाली जीवे मारण्याची धमकी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : मुंबईतील वांद्रे परिसरात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांचा उल्लेख करणारे एक पत्र सापडले होते. या पत्रात तुझा सिद्धू मुसेवाला करु, अशी धमकी सलमान खानला उद्देशून देण्यात आली होती. या धमकीपत्रानंतर खबरदारी म्हणून सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
हेही वाचा:शिंदे गट आणि शिवसेनेच्या याचिकांवर उद्या सुनावणी, जाणून घ्या नेमकं काय घडलं?…

धमकी देण्यामागे ‘या’ गँगचा हात

दरम्यान, सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर या प्रकरणी वांद्रे पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमान खानला धमकी देण्यामागे लॉरेन्स बिष्णोई गँगचा हात असल्याचा संशय महाराष्ट्र गृहविभागाला होता.
हेही वाचा:८२ वर्षांचे आजोबा पंचायत निवडणूकीच्या रिंगणात…

सलमानला मिळाला शस्त्र परवाना

या धमकीनंतर सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांची भेट घेतली होती. या भेटीत त्याने स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना द्यावा, अशी मागणी अर्जाद्वारे मुंबई पोलिसांकडे केली होती. त्यानंतर आता सलमान खानला हा परवाना देण्यात आला आहे.
हेही वाचा:मोरजीत विविध प्रभागांत नातेवाईक आमने - सामने…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!