मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती देणारे `साहित्यवेदी`

मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते `साहित्यवेदी` संकेतस्थळाचं अनावरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबईः मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात जगभरातील मराठीप्रेमींना उपलब्ध होणार असल्याबद्दल मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आनंद व्यक्त केला. मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून चार उच्च माध्यमिक शिक्षकांनी विकसित केलेल्या ‘साहित्यवेदी’ या संकेतस्थळाचे सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचाः सर्वसामान्यांना मोठा फटका! गॅस सिलिंडरचे दर फेब्रुवारीत तिसऱ्यांदा वाढले

हेही पहाः EXCLUSIVE INTERVIEW | गोवा निवडणूक आयोग सरकारच्या हातातलं बाहुलं झालय?

नावीन्यपूर्ण संकेतस्थळ

डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद व नानासाहेब जामदार या पाठ्यपुस्तक अभ्यासगट सदस्यांनी हे संकेतस्थळ तयार केलं आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तयार केलेलं हे नावीन्यपूर्ण संकेतस्थळ आहे.

हेही वाचाः ईएसआयचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

हेही पहाः Railway | रेल्वेचे दोन डबे रूळावरून घसरले

साहित्याचा यज्ञ संपन्न करण्यासाठी सज्ज असलेलं ‘साहित्यवेदी’

मराठी भाषेचा आजपर्यंतचा प्रवास, कोशसंपदा, सुलेखनकला व्यवसाय, युवा साहित्यकार आढावा, सर्व वाङ्‌मयीन नियतकालिकांची ओळख व कार्य, महाराष्ट्र बोलींचे नमुने व परिचय, महाराष्ट्रातील शताब्दी ग्रंथालयांचे एकत्रित दालन, अनेक साहित्यकारांच्या निवासभेटीची परिक्रमा अशा अनोख्या विषयांनी साहित्याचा यज्ञ संपन्न करण्यासाठी सज्ज ‘साहित्यवेदी’ असलेलं हे पहिलंच व नावीन्यपूर्ण असं संकेतस्थळ आहे.

हेही वाचाः विधानसभा अधिवेशनाची वेळ योग्य नाही : कामत

हेही पहाः राजकारण आणि सभापती | आमदार अपात्रेवर सभापतींनी जे म्हटलं त्याच्या शक्यता सोप्या शब्दांत

माननीय भाषामंत्री सुभाष देसाई म्हणाले….

साहित्यवेदी या संकेतस्थळामुळे मराठी भाषा व साहित्य यांची सर्व अंगे एकत्रित मिळतील. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मराठीतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणं व जगातील सर्व मराठी भाषकांना जोडणं यामुळे शक्य होईल. मंत्रालयातर्फे जागतिक मंच तयार केला जात आहे, त्याच्याशी हे संकेतस्थळ जोडून घेता येईल.

शालेय स्तर ते संशोधक-अभ्यासकांसाठी उपयुक्त संकेतस्थळ

हे संकेतस्थळ शालेय स्तर ते संशोधक-अभ्यासक यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याला उज्ज्वल परंपरा आहे. एक दिवस भाषादिन साजरा करून त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यापेक्षा वर्षभर ते सतत दृष्टिक्षेपात राहावं, या हेतूने www.sahityavedi.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. मराठी भाषेविषयीचे डॉ. गणेश देवी, डॉ. नीलिमा गुंडी, हरी नरके, डॉ. विद्या देवधर यांच्यासह अनेकांचे अभ्यासपूर्ण लेख तसंच विविध विषयांचा अंतर्भाव दृक्-श्राव्य फितींसह यात केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!