सागर चव्हाण यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा 2020’

मुंबईत सोमवारी होणार पुरस्कार वितरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा 2020’ जाहीर झालाय. या पुरस्काराच वितरण सोमवारी 23 नोव्हेंबरला रोजी सायं. 5 वाजता मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील हॉटेल पेनीन्सूला इथं मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच आयोजन दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्मकडुन कल्याणजी जाणा यांनी केलंय.

कोरोनासारख्या महामारीत लॉकडाऊन काळात गोरगरीब मजूर, असहाय्य परप्रांतीयांना अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या चित्रपट श्रुष्टीतील कलाकार, मिडिया क्षेत्रातील संपादक, पत्रकार, संशोधक, एनजीओ आदी क्षेत्रातील व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार बहाल करुन सन्मानित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड 2020’ च्या ट्रॉफीचं नुकतेच अनावरण करण्यात आलंय.

‘एक हात मदतीचा’ उपक्रम

कोरोना महामारीत विशेषत: लॉकडाऊन काळात कोकणच महाचॅनेल ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ ने बातम्यांच्या पलीकडे जाऊन विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक आणि शेतीविषयक उपक्रम राबविलेत. जेव्हा मार्च महिन्यात पहिलं लॉकडावून जाहीर झालं त्याच दिवसापासून सागर चव्हाण आणि त्यांची टीम मैदानात उतरली. सर्वप्रथम लॉकडावूनच्या पहिल्या दिवशी कोकणात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम हाती घेतला. सुमारे दोन हजारहून अधिक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या झोपडीत जाऊन अन्नदान केल. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अर्सेनिक आल्बम गोळ्यांसह मास्कच मोफत वाटप केल. 

‘थॅॅंक्यू सिस्टर’ उपक्रम

त्यानंतर ज्या आरोग्य सेविकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची सेवा केली अशा सिस्टरसाठी लुपिन फाऊंडेशन सारख्या समाजसेवी संस्थेला सोबत घेऊन सिस्टर डे च्या दिवशी ‘थॅॅंक्यू सिस्टर’ हा उपक्रम राबविला. सर्व सिस्टर्सना प्रत्यक्ष भेटून गुलाब देत त्यांना ‘थॅंक्यु सिस्टर’ बोलुन त्यांच्या कामाला सलाम ठोकला. तसेच त्यांना भेटवस्तू, अर्सेनिक आल्बम गोळ्या, मास्क देऊन त्यांना कामाला प्रोत्साहन दिलं. 

 ‘कृषीक्रांती 2020’ अभियान

कोरोनाकाळात उपासमारी होऊ नये म्हणून कृषी क्षेत्राला चालना देण फार गरजेच होत. त्यातच मुंबईसह देश विदेशातील तरुणांची नोकरी गेल्यान ते बेरोजगार झाले होते ते गावी आले होते. अशावेळी त्यांचे हात शेतीकडे वळविण्यासाठी ‘कृषीक्रांती 2020’ हे अभियान अनेक सामाजिक आणि सहकारी संस्थांना सोबत घेऊन हाती घेतल. प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन त्यांची यशोगाथा प्रसारित केली. कृषी अभ्यासक, कृषीतज्ञ आणि युवा शेतकरी यांच्यात सुसंवाद घडवून आणला.

कोव्हीडच्या कालावधीत रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी देखील डॉक्टर डे च्या दिवशी ‘थॅॅंक्यू डॉक्टर’ हा उपक्रम राबवत ‘डॉक्टर लाईव्ह’ हा एपिसोड सुरु केला.

‘स्मार्ट कोकणच डिजिटल एज्युकेशन’

खरं तर, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला तो शिक्षण क्षेत्राला. त्यामुळे ‘स्मार्ट कोकणच डिजिटल एज्युकेशन’ या शैक्षणिक उपक्रमाची महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरुवात केली. या उपक्रमाअंतर्गत कोकणातील तज्ञ शिक्षकांना सोबत घेऊन शहरापासून खेड्या वस्तीत वसलेल्या मुलांसाठी सर्वप्रथम ‘ऑनलाईन वर्ग’ सुरु केलेत. त्याचा लाभ आज हजारो विद्यार्थी घेत आहेत. 

कलाकारांना ‘डिजिटल प्लँटफॉर्म’

कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला तो कोकणच्या लोककलेला. लॉकडावूनमुळे कलाकार घरी बसले होते. आपली कला ते रंगमंचावर सादर करु शकत नव्हते. साहजिकच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. कलेवर पोट असणाऱ्या दशावतार कलाकारांना,भजनी बुवांना आपली कला सादर सादर करण्यासाठी सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हने ‘डिजिटल प्लँटफॉर्म’ उपलब्ध करुन दिला. सिंधुदुर्ग दशावतार चालक-मालक संघटनेला सोबत घेऊन नामवंत दशावतार कलाकारांना एकत्र आणून एकापेक्षा एक असे ६ दशावतार नाट्यप्रयोग थेट लाईव्ह प्रक्षेपित केले. देश विदेशातील लाखो रसिकांनी सिंधुदुर्ग लाईव्ह च्या नेटवर्क वरुन या कलेचा मनमुराद आनंद घेतला आणि गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून दशावतार कलाकारांवर बक्षिसांचा वर्षाव केला.

कोकणातील नामवंत भजनी बुवांना सिंधुदुर्ग लाईव्हने सर्व प्रथम डिजिटल व्यासपीठ मिळवून दिलं. डबलबारीचे ६ लाईव्ह सामने, तिरंगी आणि चौरंगी बारीचा लाईव्ह सामना आयोजित केला. मुंबईसह देश विदेशातील लाखो भजन रसिकांनी बारीच्या या लाईव्ह सामान्यांना तुफान प्रतिसाद देत भजनी बुवांवर गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून बक्षिचांची अक्षरशः खैरात केली.

सिंधुदुर्ग लाईव्हने ‘लाईव्ह फुगडी महोत्सव’ आयोजित केला. महिलांना कलाकारांना डिजिटल व्यासपीठ मिळवून दिलेचं पण त्याबरोबर डिजिटल रोजगार पण उपलब्ध करुन दिला. 

ऑनलाईन स्पर्धा

ऑनलाईन अभंग गायन स्पर्धा, ‘मालवणी स्वाद’ ही ऑनलाइन रेसिपी स्पर्धा, आयपीएलच्या धर्तीवर ऑनलाइन ‘MyIPLStar’ ही ऑनलाइन स्पर्धा घेऊन कोकणवासीयांच्या कलागुणांना कोरोनासारख्या महामारीत जिवंत ठेवण्याचा यशस्वी प्रयन्त केला. सिंधुदुर्ग लाईव्हने ‘सेलिब्रिटी लाईव्ह’ हा उपक्रम हाती घेतला. शिवाजी पालव यांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून ‘कोरोना आणि मन’ यावर अध्यात्मिक मार्गदर्शन केलं.

कोव्हीडच्या या काळात एक क्षणही न थांबता अखंडपणे केलेल्या या सर्व उपक्रमांची, सिंधुदुर्ग लाईव्हच्या कार्याची दखल राज्यस्तरावर काम करणाऱ्या दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्मसकडून घेण्यात आली. या उल्लेखनीय कार्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.