सचिन तेंडुलकरही कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबीयांना लागण नाही

राजकीय नेते, बॉलिवूडनंतंर आता स्पोर्ट्स सेलेब्रिटीही कोरोनाच्या विळख्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राजकीय नेत्यांपाठोपाठ आता सिनेकलाकारांमध्ये कोरोनाचा (Coronavirus) विळखा वाढत असतानाच क्रिकेट विश्वातून कोरोनाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झील आहे. खुद्द सचिननेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. सचिनने ही पोस्ट शेअर करताना तो कोव्हिडबाबत योग्य खबरदारी घेत असल्याचंही म्हटलंय.

भारताच्या दिग्गज क्रिकेटर्स पैकी एक असणाऱ्या सचिन तेंडुलकरने पॉझिटिव्ह असल्याची माहिती देताच चाहतेही धास्तावलेत. लवकरच बरं होण्यासाठी चाहत्यांनी सचिनला शुभेच्छा दिल्यात. सचिनला आढळून आलेली कोरोनाची लक्षणं सौम्य स्वरूपातील आहेत. सचिनचे कुटुंबीय निगेटिव्ह असल्याचंही त्याने सांगितलंय.

हेही वाचा – कोरोनाचा फटका उत्सवांना, शिमगोत्सवासह अनेक उत्सवांवर मर्यादा

सचिनने केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की,

‘कोरोना दूर ठेवण्यासाठी मी योग्य खबरदारी घेत होतो आणि चाचणी देखील करत होतो. मात्र तरीदेखील सौम्य लक्षण आढळून मी पॉझिटिव्ह आढळलो आहे. घरातील इतर सदस्य कोरोना निगेटिव्ह आहेत. मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलं आहे आणि माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी आवश्यक प्रोटोकॉल्सचे पालन देखील करत आहे. मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो जे मला आणि देशातील इतरांना पाठिंबा देत आहेत. सर्वांनी काळजी घ्या.’

बॉलिवूडमध्ये संसर्ग

बॉलिवूड अभिनेता आणि राजकीय नेते परेश रावल यांना कोरोनाची लागण ( Paresh Rawal Tests Positive For Corona ) झाली आहे. परेश रावल यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली आहे. याबद्दलची माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – बाबुश मॉन्सेरात यांनाही कोरोनाची लागण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!