धक्कादायक! लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन

कोरोनाची लागण, हृदयविकाराचा धक्का

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः वरीष्ठ टीव्ही पत्रकार आणि आज तक वाहिनीचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे आज सकाळी निधन झालं. त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोहित सरदाना हे झी न्यूजसोबत होते. २०१८मध्ये त्यांनी झी न्यूज सोडून ‘आज तक’मध्ये आपल्या प्रसारमाध्यमातील प्रवासाला सुरुवात केली. २०१८मध्ये त्यांना पत्रकारितेतील मानाच्या गणेश विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २४ एप्रिल रोजी रोहित सरदाना यांनी स्वत:च आपल्याला करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं ट्विट

देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देकील रोहित सरदाना यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. हिंदी मीडिया जगतात फार कमी कालावधीमध्ये आपली ओळख निर्माण करणारे पत्रकार रोहित सरदाना यांच्या निधनामुळे मी स्तब्ध झालो आहे. ते प्रचंड प्रतिभाशाली आणि प्रभावी पत्रकार होते. त्यांच्या निधनामुळे माध्यम विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. माझ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत”, असं राजनाथ सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राजदीप सरदेसाई यांचं ट्विट

मित्रांनो खूपच धक्कादायक बातमी आहे.  लोकप्रिय टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालंय. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला.  त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन. आरआयपी, असं ट्विट राजदीप सरदेसाई यांनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोहित सरदाना यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत लिहिलंय, ‘रोहित सर… रोहित सरदाना खूप लवकर आम्हाला सोडून गेले. देशाच्या प्रगतीसाठी ऊर्जेने भरलेले होते आणि भावुक होते, रोहितची आठवण अनेकजण काढतील. रोहितच्या निधनाने मीडिया जगतात एक मोठा शून्य निर्माण केलाय. त्यांच्या आप्तेष्ठांना, मित्र परिवाराला आणि चाहत्यांना देव शक्ती देवो, ओम शांती.’

रोहित सरदाना यांच्या निधनावर ‘आज तक’ परिवारातून हळहळ व्यक्त केली जातेय. माध्यम विश्वातील अनेकांनी त्यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे भारतात 100 हून अधिक पत्रकारांचा मृत्यू

कोरोनामुळे भारतातील 100 हून अधिक पत्रकारांनी आपले प्राण गमावले आहेत. 22 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवशी महाराष्ट्रातील तीन पत्रकारांचं निधन झालं होतं. अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचं निधन झालं. अशोक तुपे यांचं कोरोना आजारातून बरं झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून तुपे यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उस्मानाबाद येथील समय सारथीचे संस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचं आज कोरोनानं हैदराबाद येथे निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी म्हणून सध्या ते कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं तसेच उस्मानाबाद येथील दैनिक समय सारथीचे ते संस्थापक संपादक होते. तसंच ठाणे येथील वरिष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचंही पुण्यात कोरोनानं निधन झालं. राज्यात कोरोनामुळं बळी घेतलेल्या पत्रकारांची संख्या आता 105 झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!