टीआरपी घोटाळा! रिपब्लिक टीव्हीच्या सीईओला 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या सीईओंना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कथिप टीआरपी घोटाळ्याप्रकरणी त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढचे दोन दिवस त्यांची मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे.
मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. आता त्यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील चौकशीतून काय अधिक माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय.
Maharashtra: Republic TV CEO Vikas Khanchandani remanded to police custody till December 15 in alleged TRP manipulation case https://t.co/Vpu2zlH0xN
— ANI (@ANI) December 13, 2020
टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. टीआरपी घोटाळा प्रकरणी (TRP Scam Case) रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली होती. याआधीही टीआरपी घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी विकास खानचंदानी यांची चौकशी केली होती. दरम्यान, आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली होती.