रिलायन्स जिओ देशात प्रथम 5 जी लाँच करणार

मुकेश अंबानी: जिओ परदेशांमध्ये देखील 5 जी तंत्रज्ञान निर्यात करणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की रिलायन्स जिओ देशात 5 जी सुरू करेल. रिलायन्स जिओने अत्याधुनिक स्टँडअलोन 5 जी तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये प्रचंड प्रगती केली आहे, जी वायरलेस ब्रॉडबँडसाठी एक मोठी झेप आहे. मुकेश अंबानी म्हणाले की 5 जी चाचण्या दरम्यान जिओने 1 जीबीपीएसपेक्षा जास्त वेग यशस्वीपणे गाठला आहे. मुकेश अंबानी यांनी जिओच्या ‘मेड इन इंडिया’ जागतिक स्तराचं वर्णन केलं.

हेही वाचाः भारत जगातील सौर ऊर्जेचे हब बनणार

जिओच्या मजबूत नेटवर्क आर्किटेक्चरमुळे 4 जी व 5 जी मध्ये अपग्रेडेशन शक्य

अलीकडे कंपन्यांना 5 जी चाचण्या सुरू करण्यासाठी आवश्यक स्पेक्ट्रम देण्यात आला. दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये जिओ 5 जी तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. मुकेश अंबानी म्हणाले की, देशभरात पसरलेल्या डेटा सेंटरमध्ये 5G स्टँडअलोन नेटवर्क बसवण्यात आलं आहे आणि रिलायन्स जिओच्या मजबूत नेटवर्क आर्किटेक्चरमुळे 4 जी व 5 जी मध्ये अपग्रेडेशन सहज केलं जाऊ शकतं.

हेही वाचाः अखेर भीती खरी ठरली, आता ‘या’ ठिकाणी 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन

त्याधुनिक 5 जी कनेक्ट केलेली रुग्णवाहिका याचं एक उदाहरण

स्वावलंबी भारताचा संदर्भ देताना रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, एंड-टू-एंड 5 जी इकोसिस्टम विकसित करण्यासाठी आम्ही आमच्या अग्रगण्य जागतिक भागीदारांसह संपूर्ण 5 जी उपकरणं विकसित करीत आहोत. जिओ आरोग्य सेवा, शिक्षण, करमणूक, किरकोळ आणि अर्थव्यवस्थेसाठी सर्वोत्कृष्ट एप्लिकेशन विकसित करेल. रिलायन्स जिओ सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने विकसित करीत असलेली अत्याधुनिक 5 जी कनेक्ट केलेली रुग्णवाहिका याचं एक उदाहरण आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | रुग्ण बरे होण्याचा दर ९६.५२ टक्के

जिओ भारताला जागतिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न करणार

जिओ भारताला 5 जी विकास आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न करेल. एकदा जिओ चे 5जी सोल्यूशन भारत पातळीवर यशस्वी झालं की जगातील इतर देशांमध्ये त्याची निर्यात क्षमता असेल. मुकेश अंबानी यांनी माहिती दिली की जिओकडे 5 जी, एआय / एमएल आणि ब्लॉकचेन सारख्या अनेक तंत्रज्ञानात तज्ज्ञ आहेत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!