एका दिवसात 831 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनची विक्रमी वाहतूक

ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी मार्गातील अडथळे पार करत विविध राज्यांना पुरवठा ऑक्सिजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मार्गातील सर्व अडथळे पार करत आणि समस्यांवर नवी उत्तरे शोधत भारतीय रेल्वेने देशातील विविध राज्यांना वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करून या राज्यांना दिलासा देण्याचे कार्य सुरू ठेवलं आहे. आतापर्यंत, रेल्वे विभागाने देशभरातील विविध राज्यांना 295 टँकर्सच्या वाहतुकीतून वैद्यकीय वापरासाठीच्या सुमारे 4700 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.

हेही वाचाः देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 49,965 कोटी रुपये जमा

आतापर्यंत 75 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास पूर्ण

रविवारच्या एका दिवसात 75 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी वैद्यकीय वापरासाठीच्या 831 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा विक्रमी पुरवठा केला. आतापर्यंत 75 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी त्यांचा प्रवास पूर्ण केला आहे. ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या राज्यांना अत्यंत कमी वेळात शक्य तितक्या जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.

हेही वाचाः वायुदल आणि नौदल युद्धपातळीवर कार्यरत

22 एप्रिलला निघाली पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना रेल्वेची मदत घेण्यात आली. 22 एप्रिलला पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणम येथून महाराष्ट्रच्या दिशेने रवाना झाली होती. 23 एप्रिलला रात्री ती नागपुरात दाखल झाली. सर्वाधिक अडचणीच्या त्या काळात तीन टँकर प्राणवायू उपलब्ध झाला होता.

हेही वाचाः याला दिलासादायक आकडा म्हणायचं का? कारण देशात…

ऑक्सिजनची वाढती मागणी

सध्या कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे आशादायी चिन्ह असलं तरी मृत्यूसंख्येवर नियंत्रण मिळविण्याचे मोठं आव्हान वैद्यकीय यंत्रणेसमोर आहे. त्यासाठी ऑक्सिजनची मागणी अजूनही मोठ्या प्रणाणावर आहे. दुसऱ्या लाटेनेच वैद्यकीय व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असतानाच पाठोपाठ त्यात तिसऱ्या लाटेचं संकटही घोंगावते आहे. अशात ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा महत्त्वाची बाब ठरणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!