अरेच्च्या हे काय? राम मंदिरासाठीच्या देणग्यांचे हजारो चेक झाले बाऊन्स!

२ हजार चेक खुद्द अयोध्येतलेच!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने देणगी म्हणून जमा केलेले सुमारे 15 हजार चेक बाउन्स झालेत. मंदिराच्या बांधकामासाठी केंद्राने तयार केलेल्या ‘श्री रामजन्म तीर्थ क्षेत्र’ या ट्रस्टच्या लेखापरीक्षण अहवालात असं म्हटलं होतं की चेक खात्यांमध्ये कमी रक्कम असल्यामुळे किंवा काही तांत्रिक उणीवामुळे चेक बाऊन्स झालेत. 

हेही वाचाः दोतोर बोलले; काळजी घ्या, स्वतःला सांभाळा !

22,000 कोटी रुपयांचे १५ हजार चेक बाऊन्स

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरात देणगी मोहीम राबवण्यात आली होती. देशभरातून लाखो लोकांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणग्या दिल्या. काहींनी रोख रकमेच्या स्वरूपात, काहींनी ऑनलाईन ट्रान्स्फरच्या रुपात, तर काहींनी चेकच्या स्वरूपात या देणग्या दिल्या. मात्र, देणग्यांच्या या चेकपैकी तब्बल 22,000 कोटी रुपयांचे जवळपास १५ हजार चेक बाऊन्स झालेच.

हेही वाचाः Special | गोव्यातलं 700 वर्ष जुनं राम मंदिर भग्नावस्थेत

पुन्हा देणगी देण्याचं आवाहन

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमधून ही बाब समोर आली असून संबंधित देणगीदारांना पुन्हा देणगी देण्याचं आवाहन ट्रस्टकडून करण्यात येत आहे.

हेही वाचाः सर्वधर्मसमभाव! मुस्लिम सैनिकानं आपल्या खांद्यावरून हिंदू महिलेला नेलं मंदिरात

अनेक वर्षांपासूनचा राम जन्मभूमी वाद मिटला

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि हा वाद मिटला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. तसंच, अयोध्येमध्येच मोक्याच्या ठिकाणी मशिदीसाठी देखील ५ एकर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश देण्यात आले. राम मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची देखील स्थापना करण्यात आली. याच ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात प्रस्तावित राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम राबवण्यात आली.

हेही वाचाः ‘या’ आदर्श कार्यात सहभागी होऊया

२ हजार चेक खुद्द अयोध्येतलेच!

मात्र, त्यातले २२ कोटी रुपयांचे एकूण १५ हजार चेक बाऊन्स झाले आहेत. शिवाय यातले २ हजार चेक खुद्द अयोध्येमधल्याच देणगीदारांनी दिल्याची देखील माहिती समोर आली आहे.
ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेक मंजूर करण्यात आलेल्या तांत्रिक समस्यांचं निराकरण करण्यासंदर्भात बँकाना विनंती करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!