सतर्क रहा! राज्याला लागूनच असलेल्या सिंधुदुर्गात तुफान पावसाचा अंदाज

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर राज्यात आज सूर्यदर्शन झालं खरं. पण आताच हाती आलेल्या माहितीनुसार राज्याला लागूनच असलेल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहेत. त्यामुळे राज्यालाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यालाही पावसानं झोडपलं होतं. मात्र जनजीवनावर या पावसाचा कोणताही परिणाम जाणवला नव्हता. मात्र वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.
भातशेतीला धोका
तळकोकणातील किनारपट्टीभागात मुसळधार पावसानं आधीच प्रचंड नुकसान केलेलं आहे. भातशेती आडवी झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. सोबत अनियमित पावसानं भाज्यांच्या दरांवरही परिणाम झालेत. भाज्यांचे दर कडाडलेत. दुसरीकडे आता भातशेतीलाही मोठा फटका बसणार आहे. एकूणच त्याचा परिणाम महागाईवर दिसून येतो आहे.
विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट
सिंधुदुर्गासह रत्नागिरीलाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या काही तासांत जोरदार पाऊस होईल, असं सांगण्यात आलंय. दक्षिण कोकण किनारपट्टीभागात तुफान पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Heavy rainfall/thunderstorm likely in South Konkan area today; thunderstorm accompanied with lightning & rain likely at isolated places in Ratnagiri & Sindhudurg today: IMD Mumbai. #Maharashtra
— ANI (@ANI) October 19, 2020
हेही वाचा –
भाज्यांची भाववाढ, सामान्यांच्या खिशाला कात्री, वाचा कोणती भाजी कितीला?
चोर्ला घाटातून जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच