रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगाराला बोनसचं ‘इंजिन’

11.58 लाख जणांना मिळणार 2081.68 कोटी रुपये बोनस

Goan Varta Live | प्रतिनिधी


नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी खुशखबर मिळाली आहे. रेल्वेच्या 11.58 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 2019-20 मधील 78 दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मिळणार आहे, असे रेल्वेने जाहीर केले. रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकता आधरित एकूण 2081.68 कोटी रुपये बोनस मिळण्याचा अंदाज आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या 2019-20साठी आपल्या सर्व पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना वगळून) 78 दिवसांच्या वेतना एवढा बोनस देण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. बोनससाठी पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतन आकलन सीमा 7 हजार रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांसाठी अधिकतम 17 हजार 951 रुपये बोनस मिळू शकेल. या निर्णयाचा रेल्वेच्या सुमारे 11.58 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

रेल्वेच्या उत्पादकता आधारित बोनसमध्ये सर्व अराजपत्रित कर्मचारी (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचारी वगळून) समाविष्ट आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दुर्गापूजा/दसऱ्यापूर्वी बोनस मिळतो. यंदाही मंत्रिमंडळाच्या निर्णयाने दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुटीपूर्वी मिळणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!