बहीण प्रियंकासोबत राहुल गांधी पुन्हा हाथरसला रवाना

राहुल गांधी रवाना झाल्यानं यमुना एक्स्प्रेस वेवर मोठा पोलिस फौजफाटा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : हाथरल बलात्कार पीडितांच्या भेटीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी बहीण प्रियंका गांधीसोबत नवी दिल्लीहून रवाना झाले आहेत. ते हाथरसला जाऊन बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी स्वतः गाडी चालवत राहुल गांधी यांच्यासोबत हाथरससाठी निघाल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यमुना एक्स्प्रेस वेवर मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

व्हिडीओ –

पहिल्या भेटीतील नाट्यमय घडामोडी

याआधीही राहुल गांधी हाथरसला गेले होते. तेव्हा मोठा तणाव पाहायला मिळाला. पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्यानंतर राहुल गांधी यांना अटकही करण्यात आली होती. यामुळे हाथरस बलात्कार घटनेवरुन राजकारणही पेटलं होतं. राहुल गांधीच्या दुसऱ्या भेटच्या पार्श्वभूमीवर हाथरसमध्येही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बलात्काराच्या घटनेनंतर हाथरसमध्ये मोठा तणाव असल्याचं चित्र आहे.

पोलिस अधीक्षक सस्पेंड

हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कारवाई केली असून पोलिस अधीक्षकांसाह काही अधिकार्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे प्रियंका गांधी-वाड्रा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक, उप अधीक्षक आणि पोलिस निरीक्षकासह इतर अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीतही जंतर मंतरवर याप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. बलात्कार पीडित तरुणीच्या शरीरावर नराधमांनी अमानुष अत्याचार केल्याचंही समोर आलं होतं. तिची जीभ कापून टाकण्यात आली होती. तर मान मुगरळल्याचंही बोललं जातं. बलात्कारानंतर या तरुणीवर रुग्णालयात उपाचार सुरु होते. दिल्लात सुरु असलेल्या उपचारादरम्यानच या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबीयांना विश्वासात न घेताच या तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यासंपूर्ण प्रकारात उत्तर प्रदेश पोलिसांवरही सवाल उपस्थित केले जात आहेत.

जगातली कोणतीही ताकद मला रोखू शकत नाही- राहुल गांधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!