‘मोहन भागवत जर मोदींविरोधात बोलले तर त्यांनाही अतिरेकी ठरवलं जाईल’

राहुल गांधी यांचा जोरदार हल्लाबोल

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनवरुन सरकारवर निशाणा साधला. इतकंच नाही, तर मोदींविरोधात जर सरसंघचालक मोहन भागवत हे जरी बोलले, तर त्यांनी अतिरेकी ठरवलं जाईल, असं विधान राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. ते नवी दिल्लीत बोलत होते.

राहुल गांधी यांचा हल्लाबोल

केवळ चारपाच उद्योगपतींसाठी काम करणारं हे सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवतंय, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या 2 कोटी सह्यांचे निवेदन त्यांनी राष्ट्रपतींना दिलं आणि कृषी कायदामागे घेण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांत टीका केली.

सरसंघचालकांवरुन टीका

शेतकरी त्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाहीत. त्यांच्याविरोधात कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. कृषी कायदे मागे घेतले नाही तर केवळ भाजपचं किंवा संघाचंच नुकसान होणार नाही, तर संपूर्ण देशाचं नुकसान होणार आहे, असं सांगतानाच केवळ चारपाच उद्योगपतींसाठीच हे सरकार काम करत आहे. म्हणूनच मोदींविरोधात जे कोणी उभे राहतात त्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे. आज शेतकऱ्यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवलं जातंय. मोहन भागवतही मोदींविरोधात बोलल्यास त्यांनाही अतिरेकी ठरवलं जाईल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!