अभिमानास्पद! डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार

Goan Varta Live | प्रतिनिधी
पुणे : संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ या वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांना दिला जाणार आहे.
संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते माशेलकर यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष असून यापूर्वी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना अटल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पुणेरी पगडी आणि गौरवनिधी असे आहे.