‘क्यूआर कोड’ स्कॅन करताना होते फसवणूक

‘क्यूआर कोड फिशिंग’पासून सावधान

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून सायबर गुन्हेगारांचे शस्त्र म्हणून ‘क्यूआर कोड’ काम करत आहे. आपण क्यूआर कोड स्कॅन करून पेट्रोल पंप किंवा दुकानदाराला ऑनलाईन पैसे देतो. परंतु आपल्याला हे माहीत नसतं की, क्यूआर कोड स्कॅन करून आपण फसवणुकीला बळी पडू शकतो.

क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) प्रणाली प्रथम जपानमध्ये उपयोगात आणली गेली. आता त्याचा सर्वाधिक उपयोग भारतात केला जातो. परंतु जर आपण खबरदारी घेतली नाही, तर आपणही फसवणुकीला बळी पडू शकतो. ‘क्यूआर कोड फिशिंग’ म्हणजे काय आणि आपण ते कसे टाळू शकतो, या विषयी जाणून घेउया.

डिजिटल व्यवहारांना प्राधान्य हवेच, पण…

समाज वेगाने डिजिटल व्यवहारांकडे वाटचाल करत असल्याने लोकांच्या फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. कॉन्टॅक्टलेस पेमेंट करताना बरेच लोक क्यूआर कोड स्कॅन करतात आणि पैसे हस्तांतरित करतात. मात्र याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात. ते क्यूआर कोड पुन:स्थापित करतात. यामुळे पेमेंट फसवणूक करणार्‍याच्या खात्यात जाते. दुसरा क्यूआर कोड समाविष्ट करण्यासाठी समान क्यूआर कोड बदलण्याच्या प्रक्रियेला ‘क्यूआर कोड फिशिंग’ म्हणतात. यात आपले पैसे दुकानदाराकडे न जाता फसवणूक करणार्‍याच्या खात्यावर जातात.

क्यूआर कोड, यूपीआय वापरताना सावधान

क्यूआर कोड फिशिंगच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. घोटाळा करणारा आपल्याला मॅसेज किंवा ईमेलद्वारे क्यूआर कोड पाठवू शकतो. ज्यात तुम्हाला लॉटरी लागल्याची बतावणी केली जाते. तुम्हाला यूपीआय पिन देऊन तुमच्या बँक खात्यात पैसे वळवण्यास सांगितले जाते. त्यामुळे आपण तो क्यूआर कोड लागलीच स्कॅन करतो. त्यानंतर आपल्याकडे यूपीआय पिन मागितला जातो. तुमच्या खात्यात पैसे येतील असं तुम्हाला वाटेल. परंतु यूपीआय पिन दिल्यानंतर आपले पैसे सायबर गुन्हेगाराच्या खात्यात जातील.

नाव तपासल्यास धोका टळेल…

पेट्रोल पंप किंवा दुकानदाराने स्थापित केलेला क्यूआर कोड स्कॅन करुन तो बदलण्याची शक्यता असते. तेथे स्कॅमर मूळ क्यूआर कोड त्याच्या क्यूआर कोडसह बदलू शकतो. ज्यामुळे क्यूआर कोडद्वारे स्कॅन केलेले पेमेंट स्कॅमरच्या खात्यावर हस्तांतरित केले जाते. या प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी जेव्हा आपण क्यूआर कोड स्कॅन करुन पैसे द्याल तेव्हा सावधगिरी बाळगा. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्राप्तकर्त्याचे नाव त्यात येते. ते तपासूनच पैसे हस्तांतरित करा. संदेश किंवा ईमेलमध्ये आढळलेला कोणताही अज्ञात किंवा नवीन क्यूआर कोड स्कॅन करणं टाळल्यास फसवणूक होणारच नाही.

…तर तातडीने सायबर सेल गाठा

फोनच्या कॅमेर्‍यातून थेट क्यूआर कोड स्कॅन करण्याऐवजी अ‍ॅपच्या माध्यमातून करा. त्यात क्यूआर कोडची माहिती असते. आपण फसवणुकीला बळी पडला असाल, तर तातडीने सायबर सेलमध्ये तक्रार करा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!