हृदयद्रावक! अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त! आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

कार धरणात कोसळल्याने भीषण अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : रस्ते अपघातांची भीषणता किती विदारक असते, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. एका भीषण अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. आईसह तीन मुलींचा कार अपघातात मृत्यू झाल्याची भीषण घटना समोर आली आहे. अपघातग्रस्त कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय.

हेही वाचा – भीषण! डिस्चार्ज घेऊन घरी चालले होते, पण वाटेतच काळानं घाव घातला

हा भीषण अपघात घडला आहे पुण्यामध्ये. पुण्यातील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कार कोसळली. या कारमधील एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात आईसह तीन मुलींचा मृत्यू झाला. तर, महिलेचा पती सुदैवाने या अपघातात बचावला असून ते जखमी आहेत.

हेही वाचा – मागून ठोकलं! पत्रादेवी बांदा दरम्यान ट्रेलरची डंपरला धडक

अल्पना विठ्ठल भिकुले (वय ४५), प्राजक्ता विठ्ठल भिकुले(वय २१), प्रणिता विठ्ठल भिकुले(वय १७), वैदेही विठ्ठल भिकुले(वय ८, सर्व रा. चव्हाणनगर, धनकवडी) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत. अल्पना यांचे पती विठ्ठल (वय ४६) हे अपघातातून बचावले. सध्या ते जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विठ्ठल हे कार चालवत होते. भिकुले कुटुंबीय मूळचे वेल्हा तालुक्यातील असल्याचं कळतंय. विठ्ठल, त्यांची पत्नी आणि तीन मुली गावी गेले होते. शुक्रवारी हे सर्वजण गावावरून पुण्याकडे परतत होते. उरण फाट्याजवळ विठ्ठल यांचे नियंत्रण सुटले आणि त्यांची कार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडली. लोकसत्ता डिजीटल टीमनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा – दुसरी लाट नाही तर काय? 24 तासांत तब्बल 90 हजार नवे रुग्ण, 250पेक्षा जास्त मृत्यू

या भाागातील ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वेल्हे पोलिसांना दिली. त्यानंतर वेल्हे पोलीस आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडी) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मोटारीतील चौघांचा शोध घेण्यात आला. अल्पना, त्यांचे पती आणि तीन मुलींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अल्पना, प्राजक्ता, प्रणिता, वैदेही यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने वेल्हे तालुक्यात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – DARU | गोव्याची दारु महाराष्ट्रात नेताय? मग हे बघाच!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!