पुण्यात मोदी भक्तानं उभारलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर, मंदिराची शहरात चर्चा

पुण्यातील औंध परिसरात उभारलं मंदिर; मोदींचं पुण्यातील पहिलं मंदिर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पुणे: मोदींचे भक्त त्यांना काय उपमा देतील याचा नेम नाही, पुण्यातील अशाच एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींना देवाचा दर्जा देऊन चक्क मोदींचे मंदिर उभारले आहे. अर्थात यामध्ये मोदी भक्तांना काही आश्चर्य वाटत नसले, तरी सर्वसामान्य लोकांसाठी मोदींचे मंदिर हा चर्चेचा विषय ठरले आहे. यापूर्वी आपण अनेकदा मोदी भक्त हा शब्द ऐकला आहे. मात्र, त्यामुळे पुण्यामध्ये एका मोदीभक्ताने यालाच साजेशी कृती केली आहे.

हेही वाचाः गोव्यात मुलींना सुरक्षित वाटतंय का?

पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारलं

पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे.   पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी  यांनी खास जयपूर मधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहेय याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आलेला आहे. 15 ऑगस्ट 2021 दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली आहे. मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे पुण्यातील पहिलं मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे पुण्यातील पहिले मंदिर आहे. परंतु देशपातळीवर देखील पहिलेच मंदिर असल्याचा दावा केला आहे. मंदिरावरुन टीका केली तरी चालेल पण मोदींडकडून आपल्याला प्रेरणा मिळते म्हणून मंदिर उभारल्याची प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली. गेली  मुंडे हे गेली 20 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करते. पंतप्रधानांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभारले हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभारण्यात आल्याचे मुंडे म्हणाले. मंदिर उभारल्यानंतर अनेक जणांनी इथे गर्दी केली आहे.

हेही वाचाः छोटासा असला तरी या गोष्टीत गोवा नंबर एक आहे! एकदा वाचाच.. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निस्सीम भक्ताची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निस्सीम भक्त असलेल्या मयूर मुंडे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचं उघडकीस आले आहे. मयूर मुंडे यांच्या विरोधात पुण्यातीलच चतु: श्रृंगी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका ज्येष्ठ नागरिका सोबत धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. 

हेही वाचाः PHOTO STORY | श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी, सजला विठुराया-रुक्मिणीमाई

पुण्यातील औंध परिसरात स्वखर्चातून नरेंद्र मोदींचं मंदिर उभारलं

नरेंद्र मोदींचं व्यापक कार्य पाहून त्यांनी पुण्यातील औंध परिसरात स्वखर्चातून नरेंद्र मोदींचं मंदिर उभारलं आणि त्यामध्ये मोदींचा पुतळा देखील बसवला आहे. अशाप्रकारे त्यांनी नरेंद्र मोदींचा पुतळा बसल्यामुळे अल्पावधीतच ते नावारूपाला आले आहे. नावारूपाला आल्यानंतर त्यांची ही दुसरी बाजू देखील समोर आली आहे. त्यामुळे आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात सहानुभूती मिळावी किंवा काही राजकीय फायदा करून घेण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारलं तर नाही ना असा सवालही उपस्थित होत आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MANOJ PARAB BIRTHDAY | आरजी क्रांतीसाठी सज्ज- मनोज परब

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!