आंध्रचे एन. व्ही. रमन्ना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी दिली शपथ

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रमन्ना शनिवारी देशाच्या 48 वे सरन्यायाधीश (सीजेआय) बनले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती रमन्ना यांना शपथ दिली. 23 एप्रिल रोजी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती एन.व्ही. रमन्ना यांनी शनिवारी 48 व्या सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

हेही वाचाः दुर्दैवी! ऑक्सीजनअभावी दिल्लीत मृत्यूचं तांडव

26 ऑगस्ट 2022 पर्यंतच राहणार सरन्यायाधीश

सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश रमन्ना यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे, म्हणजेच ते दोन वर्षांपेक्षा कमी काळ सरन्यायाधीशपदाची धुरा सांभाळतील. रमन्ना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश असतील, जे सरन्यायाधीश बनलेत.

कुटुंबातील पहिलेच वकील..

नथालपती वेंकट रमन्ना यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ला आंध्र प्रदेशच्या पोन्नवरम गावात झाला होता. त्यांचे आई-वडील शेती करत. त्यांनी विज्ञान आणि विधी विषयांमध्ये पदवी घेतली आहे. आपल्या कुटुंबातील ते पहिलेच वकील आहेत.

हेही वाचाः कोरोना बाधित डॉक्टरांसाठी स्वतंत्र निवासाची सोय करावी

विविध विषयांमध्ये अनुभव..

१० फेब्रुवारी १९८३ला त्यांना वकिलीची मानद मिळाली. यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरण, आंध्र प्रदेश प्रशासकीय न्यायाधिकरण आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम केले. भारतीय रेल्वे आणि अशाच विविध सरकारी संघटनांसाठी ते पॅनल वकील राहिले आहेत. तसंच, त्यांनी आंध्र प्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही कामकाज पाहिले आहे. नागरी आणि गुन्हेगारी पक्षामध्ये त्यांना विशेषता प्राप्त आहे, तसंच संविधान, कामगार, सेवा, आंरराज्यीय नदी-विवाद आणि निवडणुकांसंबंधी खटल्यांचा त्यांना अनुभव आहे.

हेही वाचाः SPECIAL | करोनाला नेस्तनाबूत करणं हे एकच ध्येय : मुख्यमंत्री

कामाचा अनुभव

२७ जून २०००ला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आली. १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ यादरम्यान त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं. २ ऑक्टोबर २०१३ला त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमण्यात आलं. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०१४ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली.

हेही वाचाःनगरपालिका निवडणूक : मतदानाच्या टक्केवारीत घट

विविध देशांच्या न्यायव्यवस्थांचा अभ्यास..

पुढे युनायटेड किंगडमने त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्यांनी ग्रेट ब्रिटनचा दौराही केला. यावेळी त्यांनी ब्रिटनमधील न्यायव्यवस्थेचा अभ्यास केला. तसेच, अमेरिकेतील न्यायव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अमेरिकेचाही दौरा केला आहे. १८ जून २०१९ला रशियामध्ये झालेल्या शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्या देशांसाठी आयोजित मुख्य न्यायाधिशांच्या परिषदेलाही ते उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!