गर्भवती महिलांनी तूर्तास कोरोनाप्रतिबंधक लस घेऊ नये

नीती आयोगाची सूचना; कोरोना लस कितपत सालस याचा अभ्यास सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोना प्रतिबंधक लस गर्भवती महिलांसाठी किती सुरक्षित आहे असाही एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे, यावरही डॉ. व्ही. के. पॉल यांनी काल भाष्य केलं. गर्भवती महिलांनी तूर्तास तरी ही लस घेऊ नये, लसींच्या चाचण्यांमधून समोर आलेल्या आकडेवारीच्या आधारे डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांनी याबाबतची शिफारस केलेली नाही असंही ते म्हणाले. येत्या काही दिवसांत सरकारकडून यावर अधिक स्पष्टता दिली जाईल, तोपर्यंत लोकांना संयम बाळगण्याचं आवाहनही डॉ. पॉल यांनी केलं.

हेही वाचाः देशात बुधवारी २५ लाख २८ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण

कोरोना लस कितपत सालस याचा अभ्यास सुरू

कोणतीही लस म्हणा, औषध म्हणा, सालस असावं अशी अपेक्षा असते. त्यांनी त्याचं काम करावं, काम झालं की बाजूला व्हावं. कुणाच्या अध्यात न मध्यात. विशेषतः लस तर सालस असणं अगदी अगत्याचं. कारण लस ही मुळात निरोगी लोकांनी घेण्यासाठी आहे. ती कितपत सालस आहे याचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळे ‘लसीचा गरोदरपणात पुरेसा अभ्यास झालेला नाही’, सबब ती गरोदर स्त्रियांना आणि स्तनदा मातांना ‘देऊ नये’, असं भारत सरकारचे अधिकृत उत्तर आहे.

हेही वाचाः प्रधानमंत्री नागरी आवास योजनेंतर्गत ७०८ प्रस्तावांना केंद्रसरकारची मंजुरी

लसीबद्दल मतमतांतरे

या क्षेत्रात काम करणारे जगभरचे तज्ज्ञ, भारतातील स्त्रीआरोग्य व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञांची संघटना, अशीच जागतिक शिखर संघटना ‘फिगो’, डब्ल्यूएचओ, इत्यादी सरकारशी सहमत नाहीत. जगभरच्या तज्ज्ञ संघटनांचं गर्भवतींना लस द्या, असं सांगणं आहे. पाळीच्या वेळेला ही लस घेतली तरी चालते. वंध्यत्वासाठी उपचार चालू असतील तरीही चालते. लस घेण्यापूर्वी आवर्जून प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची गरज नाही आणि लस घेतली तरी गर्भपात करायला नको. थोडक्यात संभाव्य तोट्यांपेक्षा फायदे अधिक. सबब ही लस गरोदर महिलांना (चौथ्या महिन्यानंतर) आणि स्तनदा मातांना मिळावी, अशी साऱ्यांची आग्रहाची शिफारस आहे. मात्र त्यावर पुरेसा अभ्यास झालेल्या नसल्याने भारत सरकारने सध्या गर्भवतींनी ही लस न घेण्याच्या सूचना दिल्यात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!