POSITIVE STORY | देशात कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट

नव्या बाधितांचा आकडा तीन लाखांच्या खाली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 81 हजार 386 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 106 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

24 तासातील आकडेवारी

गेल्या आठवड्यात 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 81 हजार 386 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 106 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की रविवारच्या दिवसात देशात 3 लाख 78 हजार 741 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 74 हजार 390 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात 2 कोटी 11 लाख 74 हजार 76 रुग्ण बरे झाले आहेत. तर 35 लाख 16 हजार 997 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 18 कोटी 29 लाख 26 हजार 460 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या दिवसात 6 लाख 91 हजार 211 जणांना लसीकरण करण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!