अभिनेत्री पूनम पांडेची पती विरोधात तक्रार

दोघांचे महिन्यापूर्वी लग्न झाले आहे. गोव्यात आल्यानंतर दोघांत खटके उडत होते.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

काणकोण : पाळोळे येथील एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास असलेली सिनेअभिनेत्री पूूनम पांडे (29) हिने चित्रपट दिग्दर्शक सॅम अहमद बॉम्बे (46) याने मारहाण केल्याची तक्रार मंगळवारी काणकोण पोलिसांत केली आहे. त्या अन्वये पोलिसांनी सॅम अहमद याला भादंस 323, 504, 354, 506 (11) या कलमांखाली अटक केली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे, दोघांचे महिन्यापूर्वी लग्न झाले आहे. गोव्यात आल्यानंतर दोघांत खटके उडत होते. दरम्यान, पूनम पांडे हिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार सॅम याने तिला जबर मारहाण केली. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक रामचंद्र नायक करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!