राजकीय भूकंप! पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोडी, भाजपला फायदा होणार?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीला आता फार थोडे दिवस बाकी आहे. अशातच आताच मोठा राजकीय भूकंप पश्चिम बंगालमध्ये झालाय. पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठं वजन असणारे तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिलाय. आपल्या आमदाररीचा राजीनामा दिल्यानं बंगालचं राजकारण ढवळून निघालंय. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिलेला. आणि आता तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुका पश्चिम बंगालमध्ये लागणार आहेत. अशात आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं कंबर कसली आहे. जोरदार मोर्चेबांधणी भाजपकडून सुरु आहे. निवडणुकीला अवधी असला तरी राजकीय घडामोडींनी वेग आलाय. सुवेंदू अधिकारी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय.

सुवेंदू अधिकारी हे आता भाजपात जाणार असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या राजीनाम्यापासून ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु झालेली. मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जातंय. येत्या काही दिवसांत ते भाजपात प्रवेश करतील, असं कळतंय. भाजप निवडणुकीच्या काळात जोरदार तयारीनीशी उतरतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

पाच खासदार भाजपच्या मार्गावर

अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपाच पाच खासदार जाणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचं पक्षांतर हे काही नवीन बाब राहिलेली नाही. मात्र यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात आता नव्या घडामोडी दिसून येण्याचीही दाट शक्यताय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!