पीएनबी घोटाळाः मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही फरार

स्थानिक पोलिसांकडून शोध सुरु; पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावल्यानंतर भारतातून फरार झालेला मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही फरार झाला आहे. नीरव मोदीचा मामा आणि गीतांजली जेम्सचा प्रमोटर मेहुल चोक्सी अँटिग्वामधून फरार होऊन क्युबामध्ये गेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अँटिग्वा पोलिसांनी याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर मेहुल चोक्सीने अँटिग्वा आणि बारबुडा या देशांचं नागरिकत्व घेतलं होतं.

हेही वाचाः आयएमए, फार्मा कंपन्यांना योगगुरुंचे 25 प्रश्न

जॉन्सन पॉइंट पोलीस ठाण्याकडून मेहुल चोक्सी बेपत्ता झाल्याची तक्रार

पोलीस सध्या भारतीय व्यवसायिक मेहुल चोक्सी जे बेपत्ता झाल्याचं सागंण्यात येत आहे त्याची माहिती घेत आहेत, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं असल्याचं वृत्त Antiguanewsroom या स्थानिक प्रसारमाध्यमाकडून देण्यात आली आहे. मेहुल चोक्सीला रविवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरातून बाहेर पडताना पाहण्यात आलं होतं. जॉन्सन पॉइंट पोलीस ठाण्याने मेहुल चोक्सी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी लोकांना मेहुल चोक्सीला पाहिलं असल्यास माहिती देण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचाः VIRAL VIDEO | 1800 च्या अपार यशानंतर 10+10= 40 ची नवीन झलक…

क्युबा येथे वास्तव्यास असल्याची शक्यता

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल चोक्सी अँटिग्वा येथून क्युबा येथे गेला असल्याची शक्यता आहे. तिथे त्याची संपत्ती आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मेहुल चोक्सीच्या सहकाऱ्याने सांगितलं आहे की, मेहुल चोक्सीने देश सोडला असून सध्या तो क्युबा येथील त्याच्या अलिशान घऱात वास्तव्यास असल्याची शक्यता आहे.

हेही वाचाः VIRAL VIDEO : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदाराच्या कानाखाली वाजवली!

म्हणून चोक्सी देश सोडून फरार झाल्याची शक्यता

भारत सरकार नागरिकत्व रद्द करण्यासाठी अँटिग्वा सरकारवर दबाव आणत असल्याने मेहुल चोक्सी देश सोडून फरार झाल्याची शक्यता आहे. त्याच्याकडे अँटिग्वासोबत आणखी एका कॅरिबियन देशाचं नागरिकत्व असल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे.

हेही वाचाः कोरोनाला पळवून लावण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं

पीएनबीला लावला 13 हजार 500 कोटींचा चुना

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 500 कोटींचा चुना लावल्यानंतर भारतातून फरार झाले होते. नीरव मोदी सध्या लंडनमधील जेलमध्ये असून भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने जानेवारी 2018 मध्ये भारतातून पळ काढण्याआधी 2017 मध्ये अँटिग्वा आणि बारबुडा देशांचं नागरिकत्व घेतलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!