आज संध्याकाळी 6 वाजता मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता, देशाला संबोधित करणार

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. ट्विटरवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यताय. लोकांनी या संबोधनावेळी कनेक्ट व्हावं, असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
दुपारी 1 वाजून दोन मिनिटांनी केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये मोदींनी देशाला संबोधित करणार असल्याचं म्हटलंयं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. देशातील रुग्णवाढीचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. अनेक गोष्टी हळूहळू सुरु होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष मोदींच्या संबोधनाकडे असणार आहे. गोवनवार्ता लाईव्हच्या आमच्या वेबसाईटवर आम्ही हा संवाद लाईव्ह दाखवणार आहोत. हा संवाद आपण आपल्या मोबाईल फोनवरुनही पाहू शकता.
आज शाम 6 बजे राष्ट्र के नाम संदेश दूंगा। आप जरूर जुड़ें।
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2020
Will be sharing a message with my fellow citizens at 6 PM this evening.