जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सिरम इंन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांच्या नावाचा सामावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: टाईम मासिकाने 2021 ची जगातील सर्वात प्रभावशाली लोकांची यादी जारी केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सिरम इंन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांच्या नावाचा सामावेश आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे तालिबानी नेता मुल्ला बरादरचेही नाव या यादीमध्ये आहे.

टाईम मासिकामध्ये ट्रम्प यांचे ही नाव

बुधवारी 2021 मधील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची यादी जारी करण्यात आली. नेत्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिंस हॅरी आणि मेगन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव या यादीत आहे.

पंतप्रधान मोदी यांचा राजकीय प्रभाव

टाईम मासिकामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या प्रोफाइलमध्ये सांगण्यात आले आहे की, भारतात लोकशाहीच्या स्थापनेनंतर गेल्या 74 वर्षामध्ये 3 प्रमुख नेते राहिले आहेत. यामध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा सामावेश आहे. भारताच्या राजकारणावर सर्वात जास्त प्रभाव असणारे नेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

ममता बॅनर्जी कणखर नेतृत्व

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बाबत टाईमने लिहलं आहे की, त्या भारतीय राजकारणातील कणखर चेहरा आहेत. त्या फक्त आपल्या पक्षाचे नेतृत्वच नाही करीत तर स्वतः एक पक्ष आहेत. त्यांनी देशातील रस्त्यांवर उतरून लढाईच्या भावनेला मजबूती दिली. तसेच पितृसत्तात्मक संस्कृतीला आव्हान दिले.

 अदार पूनावाला

कोरोना काळात लस निर्मिती करणारे सीरम इंन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांना देखील प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान देण्यात आले आहे. सीरम ही जगातील सर्वात मोठी लस बनवणारी कंपनी आहे. त्यामुळे कोरोनाच्या नायनाटासाठी सीरमची भूमिका मोठी असल्याचे टाईम मासिकाने म्हटले आहे.

टाईम मासिकाच्या यादीमध्ये आश्चर्यकारक कारक नाव म्हणजे तालिबानी नेता मुल्ला बरादर होय. हा तालिबान सरकारचा मोठा चेहरा असून सर्व महत्वाचे निर्णय तोच घेत आहे.

हा व्हिडिओ पहाः FRAUD | बँकेची नोकरी गेलीच, अटकेची कारवाई

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!