ब्रेकिंग | मोदींची उच्चस्तरीय बैठक! काय घोषणा होणार?

आज रात्री ८ वाजता पंतप्रधानांची बैठक

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत महत्त्वाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहे. आज रात्री ८ वाजता होणाऱ्या या बैठकीत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत नेमके काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचंय.

हेही वाचा – CORONA UPDATE | धक्कादायक । निवडणुकीच्या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला दुप्पट

निवडणुकांनंतर पुन्हा लॉकडाऊन?

सध्या पश्चिम बंगलाच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्या संपल्यानंतर संपूर्ण देशात पुन्हा एकदा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावलं जाणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, आढावा बैठकीतून पंतप्रधान मोदी संपूर्ण देशातील कोरोना महामारीचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेणार असून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहेत. देशातील अनेक भागात सध्या ऑक्सिजनचा पुरवठा, लसींची कमतरता, बेड्सची उणीव भासू लागली आहे. या सगळ्यांसाठी केंद्र सरकारकडून नेमका काय एक्शन प्लान तयार केला जातो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आज रात्री ८ वाजता होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय.

modi 800X450

हेही वाचा – CORONA | कोरोनावरील घरगुती औषधाचा दावा किती सत्य?

कोरोना लाट नव्हे ही तर त्सुनामी

अनेक मंत्रीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देशातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचाही आढावा या बैठकीतून घेतला जाणार आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २ लाख ३४ हजार ६९२ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १ हजार ३४१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, आरोग्य खात्यानं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत १ लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत देशात १ लाख ७५ हजार ६४९ रुग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या सक्रिय रुग्णसंख्या १६ लाख ६९ हजार ७४० वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ जणांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. तर ११ कोटी ९९ लाख ३७ हजार ६४१ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग चिंतेचा विषय ठरु लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी लॉकडाऊन सदृश्य नियमांचं पालन केलं जातंय.

हेही वाचा – CORONA VACCINE | ‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!