या ‘5’ गोष्टींवर बोलू शकतात मोदी

संबोधनात लसीकरण मोहीमेवर अधिक भर देण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाध साधणार आहेत. पंतप्रधान मोदी हे आज संध्याकाळी ५ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत, एएनआयने हे वृत्त दिलं आहे. पंतप्रधान मोदींकडून या संबोधनात लसीकरण मोहीमेवर अधिक भर देण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी या 5 गोष्टींवर बोलू शकतात

आज संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान जनतेला संबोधित करणार आहेत. देशात कोरोनाची लाट ओसरतेय. त्यामुळे पंतप्रधाना त्यांच्या या संबोधनात जनतेचे आभार मानू शकतात. दुसरं म्हणजे देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते देशवासियांना लसीकरणासाठी आवाहन करण्याची शक्यता आहे. तिसरं म्हणजे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी ते विशेष घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा मग तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ते नव्या घोषणा करण्याची शक्यताही सोशल मीडियावर बोलून दाखवली जातेय. कोरोनामुळे ढासळलेल्या अर्थकारणाला गती देण्यासाठी नवा मंत्रही पंतप्रधानांकडून दिला जाऊ शकतो. सोशल मीडियामध्ये अशीही चर्चा आहे, की पुन्हा नोटबंदी करण्यासाठी तर पंतप्रधान लाईव्ह येत नाहीत ना? पंतप्रधान जनतेला करणार असलेल्या या संबोधनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या शक्यता बोलून दाखवल्या जातायत.

देशात कोरोनाची लाट ओसरतेय

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांची संख्या देशात १ लाख ६३६ इतकी आढळून आली आहे. तसंच एक्टिव्ह रुग्णांची म्हणजेच उपचार घेणाऱ्यांची संख्याही १४ लाखांपर्यंत कमी झाली आहे. तर लसीकरण मोहीमेत आतापर्यंत २३ कोटींहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचाः कासारवर्णे कालवा फुटून रस्त्यावर पाणीच पाणी

काही राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू; तर काही राज्यात अजूनही कडक निर्बंध

महाराष्ट्र, दिल्ली, यूपीसह अनेक राज्यांमध्ये आजपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध आणि नियमांसह अनलॉक सुरू करण्यात आला आहे. राजधानी दिल्ली मॉल, बाजार, शॉपिंग कॉम्प्लेक्स सम-विषम नियमानुसार सुरू करण्यात आले आहेत. दिल्ली मेट्रोही आजपासून सुरू करण्यात आली आहे. तर अजूनही काही राज्ये जसं की गोवा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये लॉकडाउन किंवा कडक निर्बंध कायम आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!