पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक्ससाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी साधला संवाद

24 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: नुकतंच भारताच्या खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये अप्रतिम प्रदर्शन करत 7 पदकं मिळवली. त्यानंतर आता पॅरालिम्पिक्स खेळांसाठी भारताचे खेळाडू रवाना होणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे संवाद साधला. टोक्यो पॅरालिम्पिक्स ही स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे.

हेही वाचाः फातोर्डा काँग्रेसला जोरदार धक्का

मोदी म्हणाले, तुम्ही तुमचा 100 टक्के द्या

यावेळी खेळाडूंशी संवाद साधताना मोदीजी त्यांना म्हणाले, कोरोनासारख्या संकटातही तुम्ही तुमचा सराव काय ठेवून इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेत स्थान मिळवलं हे खरंच कौतुकास्पद आहे. तुमचं पदक देशासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल. पण यासाठी आम्ही तुमच्यावर ताण टाकणार नाही. तुम्ही तुमचा 100 टक्के द्या नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल.

यावेळी खेळाडूंनी देखील मोदींशी संवाद साधत त्यांचे आभार मानले. भालाफेकपटू देवेंद्र झाजरीया म्हणाला, मोदी सर तुम्ही कायमच आमच्यासारख्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे. मी नववीत असताना माझा हात गमावला होता. त्यानंतर काय करु कळत नव्हता. पण मी मेहनत आणि सरावाच्या जोरावर इथवर पोहोचलो आहे. पण या सर्वात सरकारनेही मला खूप मदत केली आहे.

हेही वाचाः अग्निशामक दलातील रद्द झालेली ३०३ पदं भरणार

पॅरालिम्पिक्स म्हणजे काय?

पॅरालिम्पिक्स ही देखील आंतरराष्ट्रीय अनेक खेळ खेळवण्यात येणारी क्रिडा स्पर्धा आहे. ज्यामध्ये ऑलिम्पिकप्रमाणेच खेळ असतात. ज्यात सांघिक खेळांसह वैयक्तीक स्पर्धा असतात. फक्त या ठिकाणी खेळणारे खेळाडू हे अपंगत्व असलेले असतात. ज्यात एखादा शरीराचा भाग नसणं, स्नायूंची कमतरता, पायाच्या लांबीत फरक, अत्यंत कमी उंची अशा अनेक प्रकारच्या शाररिक बाधा असणारे खेळाडू सहभाग घेतात. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीद्वारे (आयपीसी) या खेळांचं आयोजन केलं जातं.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | WOMEN | CRIME | गोवा भयमुक्त करा : संकल्प आमोणकर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!