खूशखबर! पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार

2000 ऐवजी 4000 मिळणार; सरकारची नेमकी योजना काय?

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचे हप्ते येऊ शकतात. माध्यमांच्या अहवालांवर विश्वास ठेवायचा झाल्यास मोदी सरकार लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना गिफ्ट देऊ शकतं. अहवालानुसार, केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाची रक्कम दुप्पट करण्याचा विचार करीत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12000 रुपये मिळू शकतात.

हेही वाचाः काबूलहून परतलेल्या एअर इंडियाच्या विमानाची गोष्ट

वार्षिक 6,000 रुपये दिले जातात

मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत भेट घेऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळत असलेली रक्कम दुप्पट करण्याबाबत चर्चा केली. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

हप्ते कधी येतात माहीत आहे का?

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6,000 रुपये पाठवले जातात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये पाठवले जातात. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये पाठवले जातात. दर 4 महिन्यांनी एक हप्ता येतो. पीएम किसान पोर्टलनुसार, योजनेचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान येतो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतो. तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.

हेही वाचाः अधुरी एक कहाणी! ब्लॅक फंगसच्या भीतीपोटी दांपत्याने संपवलं आयुष्य

योजना 2019 मध्ये सुरू झाली

मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो. दुसरा हप्ता थेट 1 एप्रिल ते 31 जुलै आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | POLITICS | ‘एकला चलो रे’ ही वैयक्तिक भूमिका : कांदोळकर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!