देशात प्लाझ्मा थिरपी लवकरच बंद होणार, आयसीएमआरचे संकेत

प्लाझ्मा थिरपीचा कोरोना रोखण्यात उपयोग नाही?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ज्या प्लाझ्मा थिरपीवर आरोग्य यंत्रणेने विश्वास दाखवला होता, त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. देशात लवकरच प्लाझ्मा थिरपीचा वापर बंद केला जाण्याची शक्यता आहे. खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तसे संकेत दिले आहेत.

आयसीएमआरचे डायरेक्टर डॉक्टर बलराम भार्गव यांनी पत्रकारांशी बोलताना यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. नॅशनल कोविड ट्रीटमेन्ट गाईडलाईन्सद्वारे प्लाझ्मा थिरपी कायमची हटवली जाण्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यादिशेने लवकरच निर्णय होऊ शकतो, असाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे. अद्याप यावर निर्णय झालेला नसला, तर सध्या सुरु असलेली चर्चा ही त्याच अनुशंगानं सुरु आहे. लवकरच याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत.

प्लाझ्माचा फायदा झाला नाही?

कोरोना रुग्णाला वाचवण्यासाठी सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा थिरपीची मोटी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र एका अभ्यासातून तसा कोणताही ठोस फायदा प्लाझ्मा थिरपीमुळे झालेला नसल्याचं समोर आलंय. कोरोना रुग्णसंख्या रोखण्यातही तसा कोणताही फायदा झाला नाही, असंही सांगण्यात आलंय.

आयसीएमआरने 14 राज्यातील 39 हॉस्पिटल्समध्ये 464 रुगणांवर प्लाझ्मा थिरपीचा अभ्यास केला. जगातील हा प्लाझ्मा थिरपीला घेऊन केलेला सगळ्यात मोठा अभ्यास होता. मात्र मृत्यू रोखण्यात तसा कोणताही विशेष फायदा झाला नसल्याचं प्लाझ्मा थिरपीवर करण्यात आलेल्या आयसीएमआरजच्या अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे आता लवकरच देशातील कोरोना रुग्णांचा उपचार देताना सध्या दिली जाणारी प्लाझ्मा थिरपीची पद्धत हद्दपार केली जाणार असल्याचं वैद्यकीय क्षेत्रात बोललं जातंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!