Photo Story | स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूर मंदिराला तिरंगी आरास, पहा फोटो…

पंढरपुरमध्ये श्री विठ्ठल मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास

Goan Varta Live | प्रतिनिधी

पंढरपुर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंढरपुरमध्ये श्री विठ्ठल मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. श्रावणी सोमवार आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झेंडू, शेवंती आणि तुळशीच्या पानांने देवाचा गाभारा, सोळाखांबी प्रवेश द्वार आणि सभामंडप सजवण्यात आला आहे.
हेही वाचा:Shocking | Crime | पाच महिन्यांच्या चिमुकलीचा जन्मदात्यांनीच घेतला बळी, लाटण्याने…

संपूर्ण विठ्ठल मंदिराला तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई

स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठलास पिवळा अंगारखा, जांभळे धोतर आणि तिरंग्याचे उपरणे असा पोशाख करण्यात आला आहे. तर संपूर्ण विठ्ठल मंदिराला तिरंगा रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई लावण्यात आली आहे. तिरंग्यामध्ये सजलेले देवाचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात मोठी गर्दी केली आहे.
हेही वाचा:Accident | शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!