PHOTO STORY | उत्तर प्रदेशमधील भयावय दृश्य; मृतदेहांचा खच पाहून प्रत्येकजण सुन्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः उत्तर प्रदेशमधील प्रयागराजजवळी गंगा किनाऱ्यावर अनेक मृतदेह पुरलेल्या स्थितीत पाहून अनेकजण सुन्न झालेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच गंगा नदीत अनेक मृतदेह वाहून आल्यानंतर जगभरातून यावर टीका झाली. गंगा नदीत आढळलेल्या अनेकांना कोरोना संसर्ग झालेला असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. आता या भागात गंगा किनारी राज्याच्या नैसर्गिक आपत्ती दलाच्या जवानांची तैनाती करण्यात आलीय. गंगा किनारी दफन करण्यात आलेल्या या मृतदेहांमध्ये कोरोना संसर्गित लोकांचाही समावेश असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे यातून कोरोना संसर्गाचा धोकाही निर्माण होऊ शकतो असं जाणकार सांगत आहे. याशिवाय उत्तर प्रदेश सरकारवर सातत्याने कोरोना रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी लपवल्याचाही आरोप होतोय. त्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं मोठं आव्हान सध्या उत्तर प्रदेश सरकारसमोर दिसतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!