PHOTO STORY | कामिका एकादशीनिमित्त विठुराया अन् रुक्मिणीमाता मंदिराची सजावट

बार्शी येथील विठ्ठल भक्त श्रीकांत शिवाजी गणपुले यांनी विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांच्या सजावटीची सेवा दिली; आकर्षक सजावटीचे पाहा फोटो

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः प्रत्येक एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली जाते. आज आषाढ कृष्ण अर्थात कामिका एकादशी निमित्त देखील मंदिराला आकर्षक अशी सजावट केली आहे. बार्शी येथील विठ्ठल भक्त श्रीकांत शिवाजी गणपुले यांनी विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांच्या सजावटीची सेवा दिली आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी, नामदेव महाद्वार या ठिकाणी अतिशय वैविध्यपूर्ण पद्धतीने ही फुल सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या मदतीने सजावट करताना लहान लहान धबधबे अतिशय कल्पकतेतून साकारण्यात आले आहेत. या सजावटीसाठी झेंडू, मोगरा, कामिनी, ब्ल्यू डीजे, टटिस, शेवंती, गुलछडी, गुलाब अशा 15 प्रकारच्या फुलांचा व विविध रंगी पानांचा आकर्षक पद्धतीने वापर करण्यात आला आहे. सध्या कोरोनामुळं मंदिर बंद असलं तरी सर्व नित्योपचार पार पाडले जात आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!