PHOTO STORY | ना पालखी सोहळा, ना वैष्णवांचा मेळा

भक्तांअभावी पंढरीत चंद्रभागेचा काठ सुना

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आज आषाढी एकादशी. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. विठुरायाच्या जयघोषात दुमदुमून निघणाऱ्या पंढरीत यंदा मात्र शुकशुकाट दिसत आहे. प्रथेप्रमाणे पायी वारी निघाली असती तर आज पंढरीत वैष्णवांचा मेळा पाहायला मिळाला असता. चंद्रभागेच्या काठावरती 65 एकरमध्ये दिंड्यांना उतरवण्यासाठी जी जागा आरक्षित केली आहे तिथे या वेळी पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नसती. पण आज मात्र हा काठ सुनसान आहे. असंख्य वारकरी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी यावेळी गर्दी करत असतात. आज मात्र या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!