Photo Story | या सापांबद्दल तुम्हांला माहिती आहे का?

भारतात सापाला विशेषतः नागाला देव मानले जाते

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : साप म्हटले की बहुधा सगळ्यांचे डोळे मोठे होतात. डोळ्यांसमोर जर एखादे चित्र उभे राहत असेल तर फणा काढून फुत्कारणाऱ्या नागाचे. घरी साप आला किंवा कुठे दिसला तर त्याला पकडून मुद्दाम जीवे मारले जाते. या काही वर्षात लोकांमध्ये जागृती झाल्याने असे प्रकार काही अंशी कमी झाले असले तरी ते संपलेले नाहीत.
हेही वाचा:GOA | मद्यप्राशन करून वाहन चालवाल तर तुरुंगात जाल…

पर्यावरणामध्ये महत्वाची भूमिका

भारतात सापाला विशेषतः नागाला देव मानले जाते. त्याला दूध पाजण्याचे प्रकारही याच अंधश्रद्धेतून केले जातात. नागपंचमीला त्याची पूजाही होते. मात्र नाग सोडूनही जगभरात सापांच्या अनेक जाती आहेत. ज्या पर्यावरणामध्ये महत्वाच्या भूमिका बजावत असतात. सर्व प्रजातींची माहिती एकाच वेळी देणे शक्य नसले तरी आपल्या आजूबाजूला सामान्यतः आढळणाऱ्या सापांबद्दल विशेषतः जे विषारी साप आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. 
हेही वाचा:WhatsApp Trick | ‘इंटरनेट’ नसतानाही वापरता येणार व्हॉट्सअ‍ॅप, जाणून घ्या जबरदस्त ‘ट्रिक’

नाग 
भारतात सर्वत्र नागाची प्रजाती दिसून येते. नाग पूजनीय मानला जातो. विषारी असल्याने जनमानसात त्याची भीतीही दिसून येते. त्याच्या डोक्यावर असणाऱ्या नक्षीमुळे तो अधिक आकर्षक दिसून येतो. यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या त्रासही दिला जातो.
हेही वाचा:भारतात वधू वराचा ‘ऑनलाईन विवाह’, नक्की काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर…

मण्यार 
भारतातील विषारी प्रजातींपैकी मण्यारची गणना होते. नागापेक्षाही हा अधिक विषारी असतो. हा रात्रीच्या वेळी दिसतो तसेच हा स्वजातिभक्षक आहे जो इतर सापांना खातो.  याचा दंश सुरुवातीला जाणवत नाही. लक्षणे वाढली की लक्षात येते. दिसायला हा साप नम्र असला तरी तो केव्हा आक्रमण करेल काही सांगता येत नाही. त्यामुळे यांच्यापासून थोडे जपूनच राहिले पाहिजे.

घोणस 
विषारी सापांच्या प्रजातींमधील या सापाच्या दंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. याची छेड काढली तर हा अजिबात सहन करून घेत नाही. याला त्रास दिल्यास एक मोठा आवाज करतो जो अगदी प्रेशर कुकरच्या शिटीसारखा असतो. हा खूप जलद दंश करणारा साप आहे. 

फुरसा 
आकाराने लहान असला तरी देशातील विषारी सापांमध्ये पहिल्या चारमध्ये गणना होणारा हा साप आहे. आपल्या शरीरावर त्वचा घासून हा करवतीसारखा आवाज निर्माण करतो. हा आवाज म्हणजे त्याच्यापासून दूर राहण्याची सूचना असते. मोठ्या प्रमाणात दगडी डोंगरांवर हा आढळून येतो. 

याबरोबरच काही बिनविषारी सापही आपल्या आजूबाजूला आढळून येतात. ज्यांचा मानवी जीवाला काही धोका नसतो. ते खालीलप्रमाणे आहेत… 

१. भारतीय अजगर /चितीन 

२. धामण/रॅट स्नेक 

३. कवड्या/वोल्फ स्नेक 

४. नानेटी/ स्ट्रिप्ड किलिबॅक 

५. धिवाड/ चेकर्ड किलिबॅक 

६. पट्टेरी कुकरी/बँडेड कुकरी 

७. मांडूळ

८. चंचू वाळा सर्प 

९. रुका 

१०. हरणटोळ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!