थांबा, ‘त्या’ युवतीचे फोटो व्हायरल करत असाल, तर हे वाचा…

कायद्याप्रमाणे होउ शकते दोन वर्षांची शिक्षा. बलात्कार पीडित व्यक्तीची माहिती सार्वजनिक करणे, हा मोठा गुन्हा.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

चंदीगढ : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील 19 वर्षीय युवतीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार करून मरणासन्न अवस्थेत सोडले होते. नंतर उपचार घेत असताना तिचा दिल्लीतील इस्पितळात मृत्यू झाला. तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. मात्र या संदर्भात एक मोठा खुलासा समोर आला असून तुम्ही ते फोटो व्हायरल करत असाल, तर सावधान. तुम्हाला चंदीगढ पोलिसांचं समन्स येउ शकतं. काय आहे हा सगळा प्रकार, ते पाहुया…

दोन आठवड्यांपूर्वी चार सवर्ण तरुणांनी बलात्कार करुन या युवतीची जीभ छाटली. नंतर तिची मान मोडल्याचा अमानुष प्रकार घडला होता. या तरुणीची 14 सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर तिची प्राणज्योत मालवली. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

बलात्कारापूर्वीचा तिचा एक सर्वसामान्य फोटो असंख्य लोकांनी शेअर केला. पण या फोटोसंदर्भात आता मोठा ट्विस्ट आलाय. हा फोटो हाथरसमधील त्या युवतीचा नव्हे, तर चंदीगढमधील युवतीचा आहे. दोन वर्षांपूर्वी किडनी विकारामुळे तिचा मृत्यू झाला. मनीषा यादव असे तिचे नाव असून फोटो व्हायरलप्रकरणी तिचे वडील मोहनलाल यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मनीषा हिचे फोटो व्हायरल झाल्यामुळे तिला ओळखणारे आणि नातेवाईकांचे फोन तिच्या कुटुंबीयांना येउ लागले. या प्रकारामुळे आपल्या मृत मुलीची व कुटुंबाची बदनामी होत असल्यामुळे मोहनलाल यादव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

भारतीय दंड संविधानाप्रमाणे कलम 499च्या पार्ट1 खाली मृत्यूनंतर एखाद्याची बदनामी केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद होउ शकतो. तसेच दोन वर्षांपर्यंतची सजा होउ शकते. त्याचबरोबर बलात्कार पीडित व्यक्तीची माहिती सार्वजनिक करणे, हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे तुम्हीही सावध व्हा आणि इतरांनाही याबाबत सावध करा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!