कोरोनाच्या भीतीने पाळीव प्राण्यांना दूर लोटू नका!

संक्रमण रोग तज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो का, अशी विचारणा करणाऱ्या तसंच लोकांनी घाबरून पाळीव प्राण्यांना घरातून काढून टाकल्याच्या किंवा दूर लोटल्याचे प्रकार घडू लागलेत. कुठलाची वैज्ञानिक पुरावा न पाहता आपल्या पाळीव प्राण्यांना रस्त्यावर सोडू लागलेत. अशा अफवांना बळी पडू नका, असं आवाहन  संक्रमण रोग तज्ज्ञ  डॉ. ईश्वर गिलाडा यांनी केलंय.

हेही वाचाः अभिमानास्पद! गोवा जलतरणपटू संजना प्रभुगावकरचा नवा विक्रम

डॉ. ईश्वर गिलाडा यांचं ट्विट

डॉ. ईश्वर गिलाडा यांचं ट्विट यांनी लोकांच्या या वृत्तीवर ट्विट करताना म्हटलंय, कोरोना आजार होण्याच्या भीतीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असं ट्वीट संक्रमण रोग तज्ज्ञ  डॉ. ईश्वर गिलाडा यांनी केलंय. माझी लोकांना विनंती आहे की अशा चुकीच्या माहितीला आणि फॉरवर्डेड मेसेजीसला बळी पडू नका.

पाळीव प्राण्यांना सोडू नका

साथ चालू असलेला करोना हा फक्त माणसांचा आजार आहे. माणसांपासून माणसांना संक्रमण होतें. माणसापासून प्राण्यांना आणि पक्षांना याची लागण होत नाही. तसंच हा आजार प्राण्यांपासून माणसाला होत नाही. पाळीव पशुपक्षी सुरक्षित असून त्यांची नेहमी सारखीच काळजी घ्या. काही वॉट्सएप समुहात पाळीव प्राण्यांसोबत घबराट पसरवणारे मेसेज टाकण्यात आले होते, त्यामुळे लोक भयभीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!