सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण चेक नाक्यावर आरोग्य पथक तैनात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोकणातील गावागावत शिमगोत्सवानिमित्त शहरातीतून लोक गावात येतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा कोकणात बाहेरून येणाऱ्यांसाठी नियम कडक करण्यात आलेत. सिंधुदुर्गात होणारी गर्दी लक्षात घेता शिमगोत्सवादरम्यान कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ नये म्हणून शासनाकडून कडक पावलं उचलण्यात आलीत. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजेच खारेपाटण चेक नाक्यावर पोलीस प्रशासन तसंच आरोग्य प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यास सुरुवात झालीये.

हेही वाचाः BREAKING | अग्नितांडव! पुणे कॅम्पमधील दुकानांचा कोळसा

शहरातून गावात येणाऱ्यांची होणार तपासणी

शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची कडक तपासणी करण्यात येणारेय. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभाग महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसंच स्थानिक ग्रामनियंत्रण समितीच्या सहकार्यातून जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कडक तपडणी केली जाणार असल्याचं समजतंय.

हेही वाचाः Corona +ve | आमदार बाबूश यांना कोरोनाची लागण

आरोग्य पथकाची नियुक्ती

दरम्यान खारेपाटण चेकपोस्टवर २६ मार्चपासून आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आलीये. 31 मार्च पर्यंत सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आलीये. या आरोग्य पथकात सीएचओ डॉ. प्रणव पाटील, डॉ. गणेश ऐतर, डॉ. धनश्री जाधव, डॉ. तेजस्वी पारकर, आरोग्य सेवक सागर खोत, गणेश तेली हे दिवसभर कार्यरत आहेत.

हेही वाचाः ALCOHOL TRAFFICKING | अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई

कोविड चाचणी आवश्यक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विचार करता जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा सीमेवर आरोग्य पथक तैनात करण्यात आलंय. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नोंद या आरोग्य पथकाने घेण्यास सुरुवात केलीये. बाहेरून येणाऱ्या नगरिकांनी त्यांची कोविड टेस्ट केलेली असणं आवश्यक आहे. वाहनांची तपासणी करणं, कुणाला सर्दी-ताप-खोकला किंवा कोरोना संसर्गाची प्राथमिक लक्षणं आढळून आल्यास त्या व्यक्तीला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करणं, ती ज्या कंटेन्मेंट झोन किंवा हॉटस्पॉट भागातून आलीये याची माहिती घेणं, तिची ट्रॅव्हल हिस्ट्री चेक करणं, थर्मल स्कॅनिंग करणं, तसंच ऑक्सिमिटरने प्रवाशांची तपासणी करण्याचं काम सध्या खारेपाटण चेक पोस्टवर आरोग्य पथकाकडून करण्यात येतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!